________________
सत्य-असत्याचे रहस्य
23
त्यातही सत्य, हित, मित आणि प्रिय आपण सत्य, हित, प्रिय आणि मित याप्रकारे काम करावे, एखादे गिहाईक आले तर त्याला प्रिय वाटेल अशाप्रकारे बोलावे, त्याला हितकारी होईल अशा गोष्टी कराव्यात. अशी वस्तू देऊ नये की जी त्याला निरुपयोगी असेल. म्हणून आपण त्याला सांगावे की, 'भाऊ, ही वस्तू तुमच्या कामाची नाही.' तेव्हा कोणी म्हणेल की, 'असे जर खरे सांगितले तर आम्ही धंदा कसा करावा? अरे, तू कोणत्या आधारावर जगत आहेस? कोणत्या हिशोबाने तू जगत आहेस? ज्या हिशोबाने तू जगत आहेस त्याच हिशोबाने धंदा चालेल. कोणत्या हिशोबाने हे लोक सकाळी उठत असतील? रात्री झोपून गेले, आणि मरून गेले तर? पुष्कळ माणसे अशी सकाळी पुन्हा उठलीच नव्हती! हे कशाच्या आधारावर? म्हणून भीती बाळगण्याची गरज नाही. प्रामाणिकतेने व्यापार कर. मग जे होईल ते खरे, पण असा हिशोब करत बसू नकोस.
खऱ्याला ऐश्वर्य प्राप्त होते. जसजशी सत्यनिष्ठा आणि असे सर्व गुण असतील, तसतसे ऐश्वर्य प्रकट होते. ऐश्वर्य म्हणजे काय, तर प्रत्येक वस्तू त्याला घर बसल्या मिळते.
त्याचा विश्वास कोण करणार? दादाश्री : कधी खोटे बोलतो का? प्रश्नकर्ता : बोलतो. दादाश्री : बऱ्यापैकी! प्रश्नकर्ता : नाही, कमी प्रमाणात.
दादाश्री : कमी प्रमाणात बोलतो. खोटे बोलण्याने काय नुकसान होत असेल? आपल्यावरचा विश्वास उडूनच जातो. विश्वास बसतच नाही ना!
प्रश्नकर्ता : समोरच्याच्या लक्षात येत नाही, असे मानून बोलतो. दादाश्री : हो, असे बोलतो, पण विश्वास उडून जातो.