Book Title: Satya Asatya Na Rahasya Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 57
________________ सत्य-असत्याचे रहस्य गेलात, म्हणून मग मताग्रह म्हणा, कदाग्रह म्हणा, दुराग्रह म्हणा, शेवटी ते सर्व हटाग्रहात जाते. 48 प्रश्नकर्ता : संसारातही सत्याचा आग्रह कुठे असतो ! दादाश्री : सत्याचा आग्रह करण्यापुरतेच करतात. आता इथे तीन रस्ते आले, तर एक म्हणेल, 'ह्या रस्त्याने चला.' दुसरा म्हणेल, 'नाही ह्या रस्त्याने'. तिसरा म्हणेल, 'नाही ह्या रस्त्याने चला. ' तिघेही वेगवेगळे रस्ते दाखवतात. आणि एक जो स्वतः अनुभवी असेल तोच जाणत असतो की 'हा एकच रस्ता खरा आहे आणि बाकीचे दोन रस्ते चुकीचे आहेत. ' तर त्याने एक-दोन वेळा असे म्हटले पाहिजे की, 'भाऊ, आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की हाच खरा रस्ता आहे. ' तरी देखील नाही ऐकले तर स्वत:चे मत सोडून देतो तोच खरा आहे. प्रश्नकर्ता : स्वत:चे तर सोडून देतो. पण त्याला माहित आहे की हा चुकीचा रस्ता आहे, तर अशा वेळी तो सोबत कसा जाईल ? दादाश्री : नंतर जे होईल ते खरे पण सोडून द्यावे. आग्रह सुटल्याने, संपूर्ण वीतरागांचे दर्शन पण प्रश्नकर्ता : म्हणजे हा असत्याचा आग्रह तर सोडायचा आहे, सत्याचाही आग्रह सोडायचा आहे ! दादाश्री : हो, म्हणूनच म्हटले आहे ना... जेव्हा सत्याचाही आग्रह सुटून जातो, तेव्हा वीतराग संपूर्ण ओळखले जातात ! सत्याचा आग्रह असतो तोपर्यंत वीतराग ओळखले जात नाहीत. सत्याचा आग्रह करायचा नाही. बघा कसे सुंदर वाक्य लिहिले आहे ! चोरी-खोटे, त्यास हरकत नाही, पण.... कोणी चोर चोरी करत असेल, आणि तो आमच्याजवळ आला व म्हणाला, की 'मी तर चोरीचा धंदा करत आहे तर आता मी काय करू?'

Loading...

Page Navigation
1 ... 55 56 57 58 59 60 61 62 63 64