________________
विचार संबंधी दोष न करण्याची, न करविण्याची किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या.
मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या. ७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची
अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. ८. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचितमात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी
परम शक्ति द्या. ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची
परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. (एवढेच तुम्ही दादा भगवान यांच्याजवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली (यंत्रवत्) वाचण्याची वस्तू नाही, अंतरात ठेवण्याची वस्तू आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावना करण्याची वस्तू आहे. एवढ्या पाठात सर्व शास्त्रांचे सार येऊन जाते.)
वेगळे होण्याची सामायिक हे शुद्धात्मा भगवान,
तुम्ही वेगळे आहात आणि चंदुभाऊ वेगळे आहेत. हे शुद्धात्मा भगवान,
तुम्ही रियल आहात आणि चंदुभाऊ रिलेटिव आहे. हे शुद्धात्मा भगवान,
तुम्ही परमेनन्ट आहात आणि चंदुभाऊ टेम्पररी आहे
(१० ते ५० मिनिटांपर्यंत उपयोगपूर्वक म्हणायचे) मी आणि चंदुभाऊ (चंदुभाऊच्या जागी स्वत:चे नाव समजायचे), दोघेही वेगळेच आहोत, असे वेगळे राहण्याची मला शक्ति द्या. मला आपल्यासारखेच वेगळे राहण्याची शक्ति द्या. मी आणि चंदुभाऊ, वेगळे रहावेत. चंदुभाऊ काय करतात, त्याला पाहायचे आणि जाणायचे, हेच माझे काम. - दादाश्री