________________
सत्य-असत्याचे रहस्य
कोणकोणते कर्म बांधले? जे बांधाल ते तुम्हाला भोगावे लागेल. स्वत:ची जबाबदारी आहे. यात देवाची कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही.
प्रश्नकर्ता : आपण खोटे बोललो असू, ते पण कर्म बांधले असेच म्हटले जाईल ना?
दादाश्री : नक्कीच! पण खोटे बोलला असाल, त्याहीपेक्षा तुम्ही जे खोटे बोलण्याचे भाव करता ना, ते जास्त मोठे कर्म म्हटले जाईल. खोटे बोलणे हे तर समजा कर्मफळ आहे. पण खोटे बोलण्याचे भाव, खोटे बोलण्याचा आपला निश्चय, त्यामुळे कर्म बांधले जाते. आपल्या लक्षात आले का? हे वाक्य काही मदत करेल का तुम्हाला? कसे मदत करेल?
प्रश्नकर्ता : खोटे बोलणे थांबवले पाहिजे.
दादाश्री : नाही. खोटे बोलण्याचा अभिप्रायच सोडायला हवा. आणि खोटे बोलले गेले तर पश्चाताप झाला पाहिजे की, 'काय करू? असे खोटे बोलायला नको होते.' पण आता खोटे बोलणे बंद होणार नाही पण खोटे बोलण्याचा अभिप्राय मात्र बंद होईल. 'आजपासून खोटे बोलणार नाही, खोटे बोलणे हे महापाप आहे, दुःखदायी आहे आणि खोटे बोलणे हेच बंधन आहे', असा तुमचा अभिप्राय झाला तर तुमचे खोटे बोलण्याचे पाप बंद होऊन जाईल. आणि या पूर्वी जोपर्यंत तुम्ही हे भाव बंद केले नव्हते, तोपर्यंतच्या त्याच्या ज्या रिएक्शन्स आहेत तेवढ्या बाकी राहतील. तेवढा हिशोब तुमच्या समोर येईल. त्यामुळे मग तुम्हाला तेवढे खोटे अनिवार्यपणे बोलावेच लागेल. तेव्हा तुम्ही त्याचा पश्चाताप करा. आता जरी त्याचा पश्चाताप केला तरीही तुम्ही जे खोटे बोललात त्या कर्मफळाचेही फळ तर येणारच. आणि ते पुन्हा भोगावेच लागेल. म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी खोटे बोलले असाल, ते लोक बाहेर तुमची बदनामी करतील की, काय हे चंदुभाऊ, चांगला शिकलेला माणूस, चक्क खोटे बोलला?! हीच काय त्याची लायकी?! म्हणजे पुन्हा बदनामीचे फळही भोगावे लागेल, जरी पश्चाताप केला असेल तरीही. आणि जर पहिल्यापासूनच ते पाणी बंद केले असेल, कॉजेस (कारण)च बंद