________________
सत्य-असत्याचे रहस्य
व्यवहार सत्य आहे, आणि तेही पुन्हा वास्तवात 'रियल' सत्य नाही. हे सर्वात अंतिम व्यवहार सत्य आहे !
प्रश्नकर्ता : तर मग सत्याला परमेश्वर म्हणतात ते काय आहे ?
दादाश्री : या जगात व्यवहार सत्याचा परमेश्वर कोण ? तेव्हा म्हणे, जो मन-वचन-कायेने कोणाला दुःख देत नाही, कोणाला त्रास देत नाही, तो व्यवहार सत्याचा परमेश्वर आणि कॉमन सत्याला कायद्याच्या रुपात ठेवले. बाकी तेही सत्य नाही. हे सर्व व्यवहार सत्य आहे.
38
समोरच्याला समजत नाही तेव्हा...
प्रश्नकर्ता : घरात मी खरे बोलतो पण मला कोणी समजून घेत नाही आणि समजून न घेतल्यामुळे ते लोक माझ्या सांगण्याचा उलट अर्थ
काढतात.
दादाश्री : अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीपासून वेगळे राहावे लागते आणि मौन ठेवावे लागते. त्यातही इतर कोणाचा दोष तर नसतोच. दोष तर आपलाच असतो. अशीही कित्येक माणसे असतात की जी आपल्या शेजारीच असतात, व आपल्या कुटुंबियांसारखेच राहतात आणि आपण काही बोलण्यापूर्वीच ते पूर्णपणे समजूनही जातात, आता अशीही माणसे आसपास असतात, पण ती माणसे आपल्याला का नाही भेटली आणि हे लोकच का भेटले ? ! हे सिलेक्शन कोणी केले ? म्हणजे या जगात सगळेच प्रकार आहेत, पण त्यांचाशी आपला सामना होत नाही, यात चूक कोणाची ? म्हणून जेव्हा घरचे आपल्याला समजून घेत नाहीत तेव्हा मौन राहावे, दुसरा उपायच नाही.
विरोधकासमोर एडजस्टमेन्ट
प्रश्नकर्ता : दुसऱ्याच्या समजूतीनुसार चुकीचे वाटत असेल तर काय करावे ?
दादाश्री : हे जे सर्व सत्य आहे ते व्यवहारापुरते सत्य आहे. मोक्षात जायचे असेल तर सर्वच खोटे आहे. सर्वांचे प्रतिक्रमण तर करावेच लागते.