Book Title: Satya Asatya Na Rahasya Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 49
________________ सत्य-असत्याचे रहस्य बोलत आहोत, ते तुमचा आत्मा मान्य करतो. येथे वादविवाद नसतो. आपल्या इथे वादविवाद कधीही झाला आहे का? कदाचित एखादा मनुष्य समजण्यात थोडासा कमी पडला असेल! पण दादांच्या शब्दांवर आजवर कोणी विवाद उपस्थित केला नाही. कारण ही आत्म्याची शुद्ध प्युअर गोष्ट आहे. आता मला सांग, राग-द्वेषपूर्ण वाणी खरी म्हटली जाईल का? प्रश्नकर्ता : नाही म्हटली जाणार, पण व्यवहार सत्य म्हटले जाईल ना? दादाश्री : व्यवहार सत्य म्हणजे निश्चयात असत्य आहे. व्यवहार सत्य म्हणजे समोरच्याला जर ते फीट (अनुकूल) झाले तर ते सत्य आणि फीट झाले नाही तर ते असत्य. व्यवहार सत्य हे वास्तवात सत्य नाहीच. प्रश्नकर्ता : आपण सत्य मानत असलो पण ते समोरच्याला फीट होत नसेल तर? दादाश्री : फीट होत नसेल तर ते सर्व खोटे. आम्ही सुद्धा सांगत असतो ना! एखाद्याला जर आमची गोष्ट समजली नसेल तर आम्ही त्याची चूक काढत नाही. आमचीच चूक आहे असे म्हणतो, की, 'भाऊ आमची अशी कोणती चूक (कमतरता) आहे की ज्यामुळे त्याला हे समजले नाही. गोष्ट समजलीच पाहिजे.' आम्ही आमचा दोष पाहतो. समोरच्याचा दोष पाहतच नाही. मला समजावता आले पाहिजे. म्हणजे समोरच्याचा दोष नसतोच. समोरच्याचा दोष पाहतो, ही तर भयंकर मोठी चूक समजली जाते. समोरच्याचा दोष आम्हाला वाटतच नाही, कधीच वाटला नाही. अशाप्रकारे होतो मतभेदाचा निकाल प्रश्नकर्ता : दुष्कृत्या समोरही लढायचे नाही का? अनिष्टते समोर? दादाश्री : लढल्याने तुमची शक्ति व्यर्थ जाईल. म्हणून भावना

Loading...

Page Navigation
1 ... 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64