________________
सत्य-असत्याचे रहस्य
वेळेवर पैसे देत नाही त्यास मी गुन्हा मानतो. वाटेत लुटारुंनी पैसे मागितले तर तुम्ही देणार की नाही? की मग सत्यासाठी नाही देणार?
प्रश्नकर्ता : द्यावे लागतात.
दादाश्री : तिथे का देता? आणि इथे का देत नाही?! हे दुसऱ्या क्रमांकाचे लुटारु आहेत. तुम्हाला वाटत नाही का, की हे दुसऱ्या क्रमांकाचे लुटारु आहेत म्हणून?!
प्रश्नकर्ता : लुटारु तर बंदूक दाखवून घेतात ना?
दादाश्री : हा नवीन प्रकारची बंदूक दाखवतो. हा सुद्धा मनात भीती घालून देतो ना की, 'महीनाभर तुला चेक देणार नाही!' तरीही शिव्या खाईपर्यंत आग्रह धरुन ठेवणे आणि नंतर लाच देण्यासाठी तयार होणे, त्याऐवजी शिव्या मिळण्या आधीच दगडाखालून हात काढून घ्या' असे भगवंताने सांगितले आहे. दगडाखालून सांभाळून हात काढा, नाहीतर त्या दगडाच्या बापाचे काही जाणार नाही. तुमचा हात मोडणार. काय वाटते तुम्हाला?
प्रश्नकर्ता : अगदी बरोबर आहे.
दादाश्री : आता असा वेडेपणा कोण शिकवणार? आहे का कोणी शिकवणारा? सगळेजण सत्याचे शेपूट धरतात. अरे, नाही हे सत्य. हे तर विनाशी सत्य आहे, सापेक्ष सत्य आहे. हो, म्हणून कोणाची हिंसा होत असेल, कोणाला दुःख होत असेल, कोणी मारला जात असेल, असे सर्व व्हायला नको.
एकीकडे बिचारा मागणारा गळ्यापर्यंत आलेला आहे आणि दुसरीकडे मॅनेजर गळ्यापर्यंत आलेला आहे, 'तुम्ही दहा हजार नाही दिले तर मी तुमचा चेक देणार नाही.'
तेव्हा हा दुसरा, सेकन्ड प्रकारचा लुटारु! हा सुधारलेला लुटारु, आणि तो बिनसुधारलेला लुटारु! हा सिविलाइज्ड लुटारु, आणि तो अनसिविलाइज्ड लुटारु!