________________
सत्य-असत्याचे रहस्य
की नाही ? कारण की तो समजून जातो की ते माझ्या हितासाठी सांगत आहेत. म्हणून आपली गोष्ट जी समोरच्याला प्रिय वाटत नाही, आणि जरी प्रिय वाटली पण हितकारी नसेल तरीही निरर्थक आहे.
मित शिवायचे सत्य,
34
कुरुप
आता फक्त एवढ्यानेही चालणार नाही. अशा तिन्ही गोष्टी एका माणसाने केल्या, सत्य सांगितले, प्रिय वाटेल असे बोलले, हितकारी वाटेल असे बोलले. पण आपण सांगू, 'आता पुरे झाले, तुमची गोष्ट मी समजलो. तुम्ही मला जो सल्ला दिला तो माझ्या लक्षात आला, आता मी जातो. ' तर तो आपल्याला काय म्हणेल? 'नाही, जाऊ नको, थांब जरा. माझी गोष्ट पूर्ण ऐक. तू ऐक तरी.' मग ते झाले असत्य. म्हणून भगवंताने मित सांगितले तिथे. मित म्हणजे प्रमाणशीर असले पाहिजे. कमी शब्दात नसेल तर ते सत्य मानले जाणार नाही. कारण की प्रमाणाबाहेर बोललो तर समोरचा मनुष्य कंटाळतो, तेव्हा ते सत्य मानले जात नाही. त्या सत्यापेक्षा रेडिओ चांगला, की आपल्याला जेव्हा स्वीच बंद करायचा असेल तेव्हा बंद करू शकू ! हा रेडिओ बंद करायचा असेल तर होऊ शकेल पण हा जिवंत रेडियो बंद होत नाही. म्हणजे ते मित नसेल तरीही गुन्हा आहे, म्हणून तेही खोटे झाले. प्रमाणापेक्षा जास्त, एक्सेस बोलले गेले तेही खोटे होऊन गेले. कारण त्यामागे त्याचा अहंकार आहे. म्हणून सत्य सांगत असेल तरीही ते वाईट दिसते, हितकारी बोलतात तरीही ते वाईट दिसून येते. कारण ते मित नाही. म्हणजे नॉर्मालिटी असली पाहिजे, तेव्हा ते सत्य मानले जाते.
मित म्हणजे समोरच्याला आवडेल इतकीच वाणी, गरजेपुरतेच बोलतो, जास्त बोलत नाही, समोरच्याला जर जास्त वाटत असेल तर तो बोलणे थांबवतो. आणि आपले लोक तर हात पकडून बसवतात. अरे त्यापेक्षा तर रेडियो चांगला, तो पकडून बसवत तर नाही. आणि हा तर हात पकडून बोलतच राहतो. असे हात पकडून बोलणारे पाहिले आहेत का तुम्ही ? 'अरे तुम्ही ऐका, ऐका, माझी गोष्ट ऐका तरी !' बघा कसे असतात ना!! मी पाहिलेत असे .