________________
सत्य-असत्याचे रहस्य
असत्य मानतो. म्हणजे काळानुसार सत्यात परिवर्तन होतच राहते. म्हणून ते सत्य कालवर्ती आहे, सापेक्ष सत्य आहे आणि शिवाय विनाशी आहे. जेव्हा सत् म्हणजे अविनाशी.
13
सत्चा स्वभाव
प्रश्नकर्ता : सत्-चित्- आनंद शब्दात जे सत् आहे ते सत् आहे की सत्य आहे ? आणि हे सत्य वेगळे आहे का ?
दादाश्री : हे सत्य तर वेगळीच गोष्ट आहे. ह्या जगात ज्यास सत्य म्हटले जाते, ती पूर्णपणे वेगळीच गोष्ट आहे. सत्चा अर्थच हा आहे की ते अविनाशी असते. अविनाशी असते आणि त्याचबरोबर गुण-पर्याय सहित असते, तसेच अगुरु-लघु स्वभावाचे असते. अगुरु-लघु म्हणजे जे पूरण होत नाही, गलन होत नाही, वाढत नाही, कमी होत नाही, बारीक होत नाही, त्यास सत् म्हटले जाते. आत्मा हे सत् आहे. नंतर पुद्गल हे सुद्धा सत् आहे. मूळ जे पुद्गल आहे, परमाणुंच्या स्वरुपात ते सत् आहे, ते विनाशी नाही. त्यात पूरण- गलन होत नाही. सत् कधीही पूरण- गलन स्वभावाचे नसते. आणि जिथे पूरण- गलन आहे ते असत् आहे, विनाशी आहे. ‘देअर आर सिक्स इटर्नल्स इन धीस ब्रह्मांड ! ' ( ब्रह्मांडात अशी सहा शाश्वत तत्वे आहेत) या इटर्नल्स ना सत् लागू होते. सत् अविनाशी असते आणि सत्चे अस्तित्व आहे, वस्तुत्व आहे आणि पूर्णत्व आहे. उत्पाद - व्यय - ध्रौव जिथे आहे, तिथे सत् आहे!! आपल्याला या जगात समजण्यासाठी सत् म्हणायचे असेल तर आत्मा हे सत् आहे, शुद्ध चैतन्य हे सत् आहे. फक्त शुद्धात्माच नाही पण इतरही पाच तत्वे आहेत. पण ती अविनाशी तत्वे आहेत. त्यांना पण सत् म्हटले जाते. ज्याचे त्रिकाळ अस्तित्व आहे ते सर्व सत् म्हटले जाते आणि सामान्य व्यावहारिक भाषेत जे सत्य म्हटले जाते, ते त्या सत्याच्या अपेक्षेने असत्य म्हटले जाईल. ते तर क्षणात सत्य आणि क्षणात असत्य !
सच्चिदानंद आणि सुंदरम्
हे सत्
सच्चिदानंदचे सत् आहे. सत्-चित्-आनंद (सच्चिदानंद) यात जे सत् आहे ते इटर्नल सत् आहे आणि हे सत्य, व्यावहारिक सत्य हे तर भ्रांतिचे सत्य आहे.