________________
सत्य-असत्याचे रहस्य
मरेल तेव्हा मिथ्यात्व दाखवा ना तुम्ही! हे तर दुसऱ्याचा मुलगा मरतो तेव्हा म्हणेल मिथ्यात्व(!) हे जग मिथ्या आहे हे खरे आहे का? हे तर परक्यासाठी मिथ्या, बरं का! स्वतः मात्र रडत बसतो! आपण शांत राहण्यास सांगू तेव्हा म्हणेल, 'भाऊ, मला तर रात्रभर आठवत होते, मी विसरुच शकत नाही.' अरे, तू तर मिथ्या म्हणत होतास ना? मग आता इथे 'ब्रह्म सत्य, जग मिथ्या' बोल ना! समजा आता जर एखादा माणूस स्वतःच्या बायकोसोबत जात असेल आणि कोणीतरी येऊन त्याच्या बायकोला पळवून नेले, तेव्हा काय तो पती 'मिथ्या आहे, मिथ्या आहे' असे बोलेल? काय बोलेल? तो तर सत्य मानूनच व्यवहार करेल ना? की मग 'मिथ्या आहे, मिथ्या आहे, घेऊन जा' असे म्हणेल?
जग, रिलेटिव सत्य 'ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या' ही गोष्ट शंभर टक्के राँग आहे. जग मिथ्या ही गोष्ट खोटी आहे.
प्रश्नकर्ता : सत्य आणि मिथ्या असे म्हटले गेले, यात सत्य हे कशाप्रकारे सत्य? आणि मिथ्या हे कशाप्रकारे मिथ्या?
दादाश्री : हो, म्हणजे हे जग कधीही मिथ्या असू शकत नाही. ब्रह्म पण सत्य आहे आणि हे जग सुद्धा सत्य आहे. ब्रह्म हे रियल सत्य आहे आणि जग हे रिलेटिव सत्य आहे. बस, इतकाच फरक आहे. ब्रह्म अविनाशी करेक्ट आहे आणि जग विनाशी करेक्ट आहे. दोन्हींच्या करेक्टनेसमध्ये काही कमतरता नाही.
जग सुद्धा सत्य आहे, असे स्पष्टपणे म्हटले पाहिजे ना? ज्या गोष्टीला मागून कोणी फुली मारेल ते काय कामाचे? 'ब्रह्म रियल सत्य आहे आणि जग रिलेटिव सत्य आहे' त्यास कोणी फुली मारू शकत नाही ना, ऍट एनी टाईम (कधीही)!!
हे प्रतिभासित सत्य नव्हे प्रश्नकर्ता : संसार हे प्रतिभासित सत्य आहे, बाकी तर सर्वत्र ब्रह्मच आहे, असे म्हणतात ना?