________________
सत्य-असत्याचे रहस्य
दादाश्री : जग इल्युजन (भ्रम) नाहीच! जग आहे, पण सापेक्षित सत्य आहे. आपण या भिंतीला मारले आणि माणसाला मारले या दोन्हींत फरक असतो. भिंतीला मिथ्या म्हणायचे असेल तर म्हणू शकतो. आगीची ज्वाळा दिसते पण खरोखर तिथे आग लागलेलीच नसते, त्यास इल्युजन म्हणतात. 'मिथ्या' बोलून तर बिघडविले आहे सर्व. ज्याच्या आधारावर जग चालते त्यास मिथ्या म्हणायचेच कसे?! हे जग तर आत्म्याचा विकल्प आहे. ही काही अशी तशी वस्तू नाही. त्यास मिथ्या कसे म्हणायचे?!
सुखाचे सिलेक्शन हे रिलेटिव सत्य टिकणारे नाही. जसे हे सुख टिकणारे नाही, तसे हे सत्य सुद्धा टिकणारे नाही. तुम्हाला जर टिकाऊ हवे असेल तर 'पलीकडे' जा आणि ज्याला तकलादी हवे असेल, तकलादीतच खूष राहण्याची ज्याला सवय असेल, तो यातच राहील. यात काय चुकीचे सांगितले ? हे तर 'ज्ञानी'चे शब्द आहेत की भाऊ, हे नाशवंत आहे, यात जास्त गुंतू नका, जास्त रममाण होऊ नका. अशा हेतुने हे सर्व सांगण्यात आले आहे. म्हणून तुम्हाला तात्पुरते सुख हवे असेल तर ते रिलेटिव सत्यात शोधा आणि शाश्वत सुख हवे असेल तर रियल सत्यात शोधा! तुम्हाला जशी आवड असेल तसे करा.
तुम्हाला विनाशीत राहायचे आहे की रियलमध्ये राहायचे आहे? प्रश्नकर्ता : रियलमध्ये राहायचे आहे.
दादाश्री : असे?! म्हणून आपले विज्ञान सांगते की ब्रह्मही सत्य आहे आणि जगतही सत्य आहे. जग विनाशी सत्य आहे आणि ब्रह्म अविनाशी सत्य आहे. सर्व सत्यच आहे. सत्याच्या बाहेर तर काही चालणारच नाही ना! जोपर्यंत तुम्हाला विनाशी आवडत असेल, विनाशी परवडत असेल, तोपर्यंत तेही सत्य आहे, तुम्ही त्यात राहा आणि जर ते विनाशी आवडत नसेल आणि तुम्हाला सनातन पाहिजे असेल तर अविनाशीत या.