________________
सत्य-असत्याचे रहस्य रहस्य
म्हणून तुम्ही असे जर म्हणाल की, 'हो, मी घेतले आहे.' आणि 'नाही घेतले' असे म्हणाल तर? सत्य म्हणजे काय? की जसे घडले असेल तसे सांगा, म्हणजे समाजाने ही रचना केली आहे, सत्याचा स्वीकार केला अशा रितीने!
प्रश्नकर्ता : आंबा खाल्ला आणि तो गोड लागला, तर ही सत्य घटना म्हटली जाईल ना?
दादाश्री : नाही, ही सत्य घटना नाही, तसेच असत्यही नाही. हे रिलेटिव सत्य आहे, रियल सत्य नाही. रिलेटिव सत्य म्हणजे जे सत्य काही वेळाने नाश पावणार आहे. म्हणून त्या सत्याला सत्य म्हणूच शकत नाही ना! सत्य तर कायमचे असले पाहिजे.
देवी-देवतांची सत्यता कोणी म्हणेल, ‘ह्या शासन देवी वगैरे सर्व वास्तवात सत्य आहे ?' नाही, हे रियल सत्य नाही, रिलेटिव सत्य आहे. म्हणजे कल्पित सत्य आहे. जसे हे सासू, सासरे आणि जावई असा व्यवहार चालत असतो ना, तसाच हा देवी-देवतांबरोबर व्यवहार चालतो. जोपर्यंत इथे संसारात आहे आणि संसार सत्य मानलेला आहे, राँग बिलीफलाच राईट बिलीफ मानली आहे, तोपर्यंत याची गरज पडेल.
स्वरुप, संसाराचे आणि आत्म्याचे... हा संसार म्हणजे काही अशी तशी वस्तू नाही, आत्म्याचा विकल्प आहे. स्वतः कल्प स्वरुप आणि हा संसार विकल्प स्वरुप! दोनच आहेत. विकल्पही काही काढून टाकण्यासारखी बाब नाही. विकल्प हे रिलेटिव सत्य आहे आणि कल्प हे रियल सत्य आहे.
म्हणून ह्या संसाराचे जाणलेले सर्वच कल्पित सत्य आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ते सर्व कल्पित सत्य आहे. पण कल्पित सत्याचीही गरज आहे, कारण की स्टेशनवर जायचे असेल तर वाटेत जो बोर्ड आहे, ते कल्पित सत्य आहे. पण त्या बोर्डाच्या आधाराने आपण पोहोच शकतो ना? तरी देखील ते कल्पित सत्य आहे, वास्तवात ते सत्य नाही. आणि