________________
सत्य-असत्याचे रहस्य रहस्य
प्रकारचे असते. सत् तर अविनाशी आहे. आणि हे सत्य तर प्रत्येकाचे वेगवेगळे असते, म्हणून ते विनाशी ठरते. हे सत्य खोटेपणाच्या आधारावर टिकून आहे.
2
प्रश्नकर्ता : सनातन सत्य यास तुम्ही मानता का ?
दादाश्री : सनातन सत्य नाही, पण सनातन सत् आहे. हे 'इटर्नल' (शाश्वत) म्हटले जाते. मूळ तत्व अविनाशी आहे आणि त्याची अवस्था विनाशी आहे.
प्रश्नकर्ता : मग सत्य म्हणजे काय ?
दादाश्री : एक आहे व्यवहार सत्य, जे संपूर्ण जगात रिलेटिव सत्य म्हणून ओळखले जाते आणि एक आहे रियल सत्य, त्यास सत् म्हटले जाते, त्यास सत्य म्हटले जात नाही. अविनाशी अस्तित्वाला 'सत्' म्हणतात आणि विनाशी अस्तित्वाला 'सत्य' म्हणतात.
नाही सामावत, सत् कशातही ...
प्रश्नकर्ता : मग सत् म्हणजे काय ?
दादाश्री : सत्चा दुसरा काही अर्थ नाहीच. सत् म्हणजे कुठलीही वस्तू जी अविनाशी असते, तिला सत् म्हणतात. त्याचा दुसरा कुठलाही अर्थ नाहीच ह्या जगात. फक्त एक सत् हेच ह्या जगात अविनाशी आहे आणि ते कुठल्याही वस्तुत सामावेल असे नाही, या हिमालयाच्याही आरपार निघून जाईल असे ते आहे. त्याला भिंतींचे बंधन किंवा असे कोणतेही बंधन नडत नाही !
रिलेटिव सत्याचे उद्भवस्थान ?
प्रश्नकर्ता : आत्म्याचे एक सत्य आहे. पण हे दुसरे रिलेटिव सत्य, हे कशाप्रकारे उत्पन्न झाले ?
दादाश्री : झाले नाही, आधीपासूनच आहे. रिलेटिव आणि रियल आहेच! आधीपासूनच रिलेटिव आहे. हा तर मी इंग्रजी शब्द बोललो,