Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 10
________________ राहतात. निष्पाप क्रिया करतात. काळजीपूर्वक करतात. कशातही त्यांचा अतिरेक नसतो. खाण्यात-पिण्यातबोलण्यात-झोपण्यात-उठण्यात-बसण्यात सावधानता असते. मर्यादा असते. पापण्यांची सूक्ष्म उघडझाप सुद्धा अगदी होशपूर्वक करतात. ही ईर्यापथिक' क्रिया होय व परिणामस्वरूप त्यांच्या पापकर्मांचा बंध होत नाही. भ. महावीरांनी त्या काळच्या समाजाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेले हे चित्र, तिन्ही काळात लागू होईल असे आहे. यात वाढत्या गुन्हेगारीचे १२ आयाम असून प्रत्येक अपप्रवृत्तीचा फोकस हा वेगळा आहे. जणूकाही हे 'सत्यमेव जयते'चेच १३ एपिसोड आहेत. सामाजिक वातावरणात जा, राजकारणात जा, असंस्कृत समाजात जा, घरात जा, मित्रमंडळीत जा किंवा अध्यात्मात जा - निष्पाप सूक्ष्म क्रियेपासून ते जन्मजन्मांतरीच्या तीव्र बंधापर्यंत, वरपासून ते खालपर्यंत, सर्व स्तराचे चांगले-वाईट दर्शन करविले. आदर्शवाद कसा असावा हे महावीरांना माहीत आहे पण पूर्ण आदर्शवाद' जगात असणार नाही, हेही त्यांना माहीत आहे. सर्व जगत् आर्य, सुसंस्कृत असावे', अशा भोळ्याभाबड्या आदर्शवादात किंवा चुकीच्या धारणेत भ. महावीर मुळीच नाहीत. जैनांचे कोणतेही तीर्थंकर अशा भ्रमात मुळीच नाहीत की आम्ही उपदेश दिला की जगात जादच्या कांडीसारखे सर्वत्र सखद, शांततामय वातावरण निर्माण होईल, व तसे असतेच तर देव-मनुष्य या दोनच गती असत्या. नरक-तिर्यंच या दुर्गति अस्तित्वातच नसत्या. अनादिकाळापासून मोक्ष जेवढा सत्य आहे तेवढीच गुन्हेगारीचे हे १२ आयामही आधी, आता व नंतरसुद्धा सत्यच राहणार आहेत. सद्विचार जेवढे खरे तेवढेच दुर्विचारसुद्धा. गौतम बुद्धासारखे 'सर्वं दुःखं' अशा दृष्टीने जगाकडे पाहणे ठीक नाही. चार्वाकासारखे 'ऋणं कृत्वा घृतवित्' असेही जगाकडे पाहणे योग्य नाही, वैदिकांप्रमाणे, 'दुष्ट खूप झाले म्हणून अवतार घेऊन त्यांचे निवारण करपही शक्य नाही.' जैन परंपरेनुसार जग हे सुख-दुःखांचे संमिश्रण आहे व राहणार. चांगल्या-वाईट प्रवृत्ती आधी होत्या नंतरही राहणार. अशा जगाचे जसे आहे तसे वास्तविक स्वरूप तीर्थंकर प्रकट करतात, हे त्यांचे ‘सर्वज्ञत्व' आहे. सर्वांना उपदेश देण्याचे कामही तीर्थंकर करतात. पण तरीही काही जीव स्वत:मध्ये काहीही बदल करत नाहीत. अशा व्यक्तींना लगाम घालणेही शक्य नाही. त्यांनाच जैन परिभाषेत 'अभवी जीव' म्हटले आहे. गुन्ह्यांची एकापेक्षा एक वरचढ रूपे सूत्रकृतांगातील या अध्ययनात नोंदवली आहेत. सत्प्रवृत्तींचे मार्गदर्शनही केले आहे. कोणता मार्ग चोखाळायचा ते व्यक्तीच्या विवेकशक्तीवर सोपवले आहे. त्यांच्या त्रिकालदर्शी प्रज्ञेला प्रणाम !!! (४) सूत्रकृतांगात निर्दिष्ट ‘पापश्रुत' अर्थात् मंत्र, तंत्र, अद्भुतविद्या व्याख्यान : डॉ. सौ. नलिनी जोशी शब्दांकन : डॉ. सौ. अनीता बोथरा 'इन्स्टंट'चे युग आहे. विचार-विनिमय करायला वेळ नाही. सबूरी नाही. स्वत:वर विश्वास नाही. अधिक पुरुषार्थही करायचा नाही. येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीशी ठामपणे लढा देण्याचे मनोबलही नाही. परिणामस्वरूप माणूस कोणाच्या ना कोणाच्या आहारी जातो व आपले आयुष्य कीर्तिसंपन्न, आरोग्यसंपन्न, धनसंपन्न व बुद्धिसंपन्न बनविण्याचे 'इन्स्टंट' उपाय शोधतो. ___ जसे - आजारी पडलो तर ‘छू मंतर' केल्याप्रमाणे, कोणा एकाचा मंत्र, अंगारा, धूपारा मिळाला की त्वरित तंदुरूस्त होण्याची आशा ; गरिबी दूर करण्यासाठी कोणा एका बुवाकडे जातो, बर तो म्हणतो - थांब रे बाबा ! तुझ्यावर कोणीतरी चांगलीच करणी केली आहे, तर मी तुला उपाय देतो ; कितीही प्रयत्न करून धंद्यात यशच मिळत नसेल तर दुसऱ्यांवरती जादू-टोण्याचा आरोप व तो दूर करण्यासाठी पळापळ ; मूलबाळ होत नसेल तर

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72