Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 48
________________ शतकापासून जैन लेखकांवरचा 'महाराष्ट्री'चा प्रभाव वाढत गेला. भद्रबाहू, कालकाचार्य आणि पादलिप्त हे जैन परंपरेतील अत्यंत प्राचीन (इ.स. दुसरे-तिसरे शतक) आचार्य व लेखक होऊन गेले. सातवाहन साम्राज्याचा विस्तार बराच मोठा होता. सातवाहन राजे प्राकृतप्रेमी होते. जैन आचार्य सतत विहार करून, त्या त्या प्रादेशिक बोली भाषेत प्रवचने करीत असत (आजही करतात). वरील तीनही आचार्य प्रतिष्ठान (पैठण) येथे राहिलेले होते. भद्रबाहू हे प्रतिष्ठान-निवासी बृहत्संहिताकार वराहमिहिरांचेबंधू होते. कालकाचार्यांचा इतिहास शक संवत आणि विक्रम संवत या कालगणनेशी जळलेला आहे. पादलिप्त हे हाल ाहनाचे निकटवर्ती होते. प्रबंधकोश, प्रभावकचरित, प्रबंधचिंतामणी - या जैन ऐतिहासिक ग्रंथांमध्ये या तीन लेखकांचे जीवन आणि साहित्य यांचा परिचय दिला आहे. भद्रबाहू व पादलिप्तांनी जैन महाराष्ट्रीत लेखन केले. इ.स.च्या ६ व्या शतकात होऊन गेलेला 'दण्डी' कवी म्हणतो, 'महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।' (काव्यादर्श १.३४) यात अपेक्षित असलेला 'महाराष्ट्र' म्हणजे आजचा भौगोलिक महाराष्ट्र नसून, त्यात महाराष्ट्या सीमेलगतच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात या प्रदेशांमधले काही भाग समाविष्ट होते. एकंदरीत, महाराष्ट्री भाषा भारतातल्या मोठ्यात मोठ्या प्रदेशातील जास्तीत जास्त लोकांना समजत होती. (प्राकृतशब्दमहार्णव प्रस्तावना पृ.४०) जैन लेखकांनी म्हणूनच तिचा साहित्यभाषा म्हणून स्वीकार केला. ___महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये जैन महाराष्ट्रीत असली तरी त्यात थोडे वेगळेपणही होते. ती अर्धमागधीने काहीशी प्रभावित होती, कारण श्वेतांबर जैन लेखकांवर अर्धमागधीचा प्रभाव होता. शिवाय ते लेखक भारताच्या ज्या ज्या प्रांतात जन्मलेले होते (उदा. हरिभद्र-राजपुताना, हेमचन्द्र-गुजरात) तेथील बोली भाषेतील शब्दसंपत्तीही त्यात होती. शिवाय जैन तत्त्वज्ञान व आचारातील अनेक रूढ पारिभाषिक शब्दही त्यात होते. दिगंबर जैनांनी 'शौरसेनी' भाषेला आपलेसे केल्यावर अर्थातच आपले सांप्रदायिक वेगळेपण राखण्यासाठी श्वेतांबर जैनांनी समझीन भाषांमध्ये सर्वात प्रभावी असलेली 'महाराष्ट्री' भाषा आपली साहित्यभाषा म्हणून निवडली. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत जैनांनी 'महाराष्ट्री' प्राकृतात लेखन केले. वरील मुद्यात दिलेले जे महाराष्ट्री भाषेतील ग्रंथ आहेत त्याच्या कित्येक पट ग्रंथ आज जैन महाराष्ट्रीत उपलब्ध आहेत. उदाहरणच सांगायचे तर १२ वे शतक हा जैन महाराष्ट्रीचा सर्वात उत्कर्ष असलेले शतक आहे. विविध जैन लेखकाच या एकाच शतकातील सुमारे ६५ ग्रंथ आज उपलब्ध आहेत. महाराष्ट्रीत काव्यांची रेलचेल आहे. कारण महाराष्ट्री ही मूलत: गीतभाषा म्हणूनच उदयास आली. तर जैन महाराष्ट्रीत काव्याबरोबरच कथा, कथासंग्रह, आख्यान, चरित (पुराण), तत्त्वज्ञान, नीती, आचार, व्रतमहिमा, तर्कशास्त्र, स्तोत्र, कर्मसिद्धांत, ज्योतिष, भूगोल - अशा अनेक विषयांवर विविध साहित्यप्रकारांची रचना दिसते. ___जैन महाराष्ट्री साहित्याच्या १६ शतकांच्या सातत्यपूर्ण वाटचालीचे सामान्यत: तीन टप्प्यात वर्गीकरण करता येते. ___ प्रथम टप्पा (तिसरे ते सहावे शतक) - प्राचीन जैन महाराष्ट्री अथवा आर्ष प्राकृत. यामध्ये नियुक्ति, भाष्य, चूर्णि, विमलसूरिकृत आद्य जैन रामायण (पउमचरिय) आणि वसुदेवहिंडी - यांचा समावेश. द्वितीय टप्पा (सातवे ते दहावे शतक) - अभिजात स्वरूप स्पष्ट दृग्गोचर. हरिभद्र, उद्योतन, शीलांक, धनपाल - हे विशेष लेखक. संस्कृतची छाप असली तरी बोलीभाषा, वाक्प्रयोग, देशी शब्दांचा वापर ही वैशिष्ट्ये. तृतीय टप्पा (अकरावे ते अठरावे शतक) - जैन महाराष्ट्रीच्या शेवटच्या टप्प्यातील वैशिष्ट्ये सुखबोधा टीक आणि 'वज्जालग्ग' मुक्तक-काव्य-संग्रहात दिसतात. व्याकरण आणि उच्चारण यावर अपभ्रंश भाषेचा प्रभाव स्पष्ट. ____ डॉ.ए.एम्.घाटगे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ होते. संस्कृत, प्राकृत, पाली, जर्मन, फ्रेंच, इंग्लिश, ग्रीक, लॅटिन - या सर्व भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. भांडारकर प्राच्य-विद्या संस्थेच्या प्राकृत-इंग्लिश महाशकोशाच्या प्रस्तावनेत ते जैन लेखक हरिभद्राच्या जैन महाराष्ट्रीस 'अभिजात' असे संबोधतात. हरिभद्रांनी 'समरादित्यकथा' ही

Loading...

Page Navigation
1 ... 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72