Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 64
________________ * जातीयवादाला खतपाणी घालणार नाही व कोणत्याही प्रकारच्या जातिविषयक चर्चामध्ये भाग घेणार नाही. मौन बाळगेन. जैनधर्माने सांगितलेल्या वचनगप्तीचा अंगीकार करेन. * एखाद्या व्यक्तीला अथवा प्राण्याला अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता, यथाशक्य मदत करण्याचा प्रयत्न करेन. * बागेत फिरायला जाताना रोज एक बाटली पाणी तेथील झाडांकरिता घेऊन जाईन. * सद्यपरिस्थितीत वाहतुकीमध्ये खूपच वाढ झालेली आहे. तेव्हा एकट्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर टाळण्याचा प्रयत्न करेन. __ * प्रत्येकाने रक्तदान तर वेळोवेळी करावेच, पण त्याचबरोबर देहदानाचा, नेत्रदानाचा संकल्पही करावा. अशा प्रकारचे दान स्वत: करण्याचा व इतरांना त्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करेन. * लोकसेवेसाठी ज्या ज्या आरोग्यसंस्था, सामाजिक संस्था काम करतात त्यांना यथाशक्य मदत करण्याचा प्रयत्न करेन. * शाळा-कॉलेजसारख्या शिक्षणसंस्थांमधून वर्षातून संस्कारवर्ग घेण्याचा प्रयत्न करेन. * गोरक्षणासाठी पुढाकार घेईन. * वाहनांचे हॉर्न व इतर प्रकारच्या आवाजाच्या माध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करेन. * उत्सव, समारंभ यांमध्ये होणारे खोटे किंवा गरज नसलेले दिखाऊपणाचे प्रदर्शन करणार नाही व त्यामुळे होणारा पैशांचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न करेन. * वृक्षारोपणासारख्या हितकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेन. * प्लॅस्टिकचा वापर करून बनविलेल्या वस्तूंचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करेन. * केवळ दुसऱ्यांना चांगल्या विचारांचे उपदेश देऊन सुधारण्याआधी त्या विचारांचे पालन स्वत: करण्याचा प्रयत्न करेन. * धार्मिक संस्थांना देवाधर्माच्या नावाने पैसे देण्यापेक्षा त्या पैशाचा उपयोग समाजातील खऱ्या अर्थाने गरजवंत जे असतील त्यांच्यासाठी करेन. * स्वत:च्या कुटुंबातील तरुण मुलामुलींना चांगले सुसंस्कारित व सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करेन. * जे सैनिकरात्रंदिवस पहारा देऊन आपल्या देशाच्या सीमांचे परकीय शक्तींपासून संरक्षण करतात त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता भाव मनात ठेवून त्यांचे नित्य स्मरण करेन. **********

Loading...

Page Navigation
1 ... 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72