Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune
View full book text
________________
मुलाबाळांप्रमाणे प्रेम करणारे जैन अगदी अल्प आहेत. पर्यावरण वाचवण्याचा उत्तम उपाय म्हणजे झाडे वाचवा, जगवा. पाणी अडवा, जिरवा. '
७) जैन रामायणातला प्रसंग. सीता लवकुशांसह आश्रमात रहात आहे. स्वयंपाकासाठी लाकडे हवी आहेत. सीता मुलांना सांगते - ‘लाकडे तोडण्यापूर्वी झाडांची क्षमा मागा. फक्त वाढलेल्या फांद्या हळुवार तोडा.'
८) बहकत चाललेल्या नव्या पिढीचा विचार करताना एका लेखिकेसमोर कुमारवयीन मुलामुलींच्या ओल्या पार्यांचा प्रसंग उभा राहतो. नैतिक आणि धार्मिक संस्कार नसलेल्या आईवडिलांविषयी लेखिका लिहून जाते ‘आपल्या पाल्याबरोबर वत्सलतेचा, ममतेचा गंध-स्पर्श न ठेवणारे आईबाप आज आहेतच ना ?' त्यानंतर लेखिका जैन धर्माची नैतिक दृष्टीने मांडणी करते.
९) एका कल्पक लेखिकेने यमलोकी गेलेल्या जीवाचा / आत्म्याचा, यमराजाबरोबर झालेला संवाद नमूद केला आहे. त्यातील ‘यमराज' हा आयुष्यकर्माचे प्रतीक म्हणून घेतला आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवताना ‘महावीरसेन पार्श्वनाथ जैन' नावाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. यमराज त्याला जैन धर्मातील ‘ईर्यासमिति’ आणि‘अप्रमाद’ यांचे महत्त्व समजावून सांगतो. पुढील जन्मी पुन्हा जैन धर्मात जन्म घेऊन काळजीपूर्वक जगण्याचे आश्वासन तो युवक देतो. लेखिकेच्या कल्पनाशक्तीला जरूर दाद दिली पाहिजे.
निबंधाच्या निमित्ताने जैन श्रावकवर्गाच्या अंतरंगाचे जे दर्शन झाले ते खरोखरच हृदयस्पर्शी आहे.
* पारितोषिक प्राप्त व्यक्तींची यादी
-
अ) प्रथम पारितोषिक – रु. १०००/- (प्रत्येकी) १) शोभा गुंदेचा २) शीतल भंडारी ३) सुमतिलाल भंडारी
ब) द्वितीय पारितोषिक - रु. ७५०/- ( प्रत्येकी) १) आशा कांकरिया २) चंदा समदडिया
क) तृतीय पारितोषिक - रु.५०० /- ( प्रत्येकी) १) शुभांगी कात्रेला २) डॉ. नयना भुरट
उत्तेजनार्थ पारितोषिक – रु. २५०/- ( प्रत्येकी) १) चंचला कोठारी २) आर्. डी. मुणोत ३) स्नेहल छाजेड ४) मनीषा कुलकर्णी ५) सविता मुणोत ६) चंदनबाला बोरा
सर्व यशस्वितांचे हार्दिक अभिनंदन !!!
परिक्षकांच्या वस्तुनिष्ठतेवर कृपया पूर्ण विश्वास ठेवावा ही नम्र विनंती.
-