Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 45
________________ पारितोषिकास पात्र ठरले. प्रथमच जैन तत्त्वज्ञानात शिरणाऱ्याला किती खोलवर पाण्यात नेता येईल याचे भान ज्यांनी ठेवले तेही पारितोषिकास पात्र ठरले. अनभिज्ञ व्यक्तीला कोणत्या प्रसंगी, किती कालावधीत जैन धर्माची तोंडओळख करून देता येईल त्याविषयी यशस्वी स्पर्धकांनी चांगली कल्पनाशक्ती वापरली. अतिशय वस्तुनिष्ठ आणि निरपेक्षते लावलेल्या रिझल्टबाबत स्पर्धक समाधानी राहतील अशी अपेक्षा करते. पारितोषिक-प्राप्त विद्यार्थी सोडून इतरांनी कशी मांडणी केली आहे त्यावर थोडे भाष्य करणे आवश्यक आहे त्यातील मुद्दे साधारणपणे असे आहे * जैन धर्माची अतिरिक्त स्तुती आणि महिमा. * जैन कुटुंबात जन्म हे केवढे भाग्याचे लक्षण आहे - याचे पानभर वर्णन. * समोरच्याचे धर्मांतर करून जणू जैनच बनवावयाचे आहे असा अट्टाहास. * आपल्याला जी जी माहिती आहे ती सर्व निबंधात कोंबली पाहिजे - असा दृष्टिकोण. * अत्यंत आकर्षक सुरवात आणि नंतर अतिशय क्लिष्ट माहिती निवेदनासारखी. * दहा फुलस्केपची मर्यादा विषयविस्तारानुसार वापरण्याचा अंदाज न आल्याने अचानक अधांतरी केलेला शेवट. * अनावश्यक गोष्टींवर निष्कारण भर - उदा. 'मुहपत्ती का लावावी ?' याचे पानभर वर्णन. स्वयंपाकघरात वर्तमानपत्र वापरल्याने अक्षरज्ञानाची आशातना होते - हा एकच मुद्दा खूप लांबलेला असणे ; २४ तीर्थंकर, शलाकापुरुष यांची नामावली ; साधुधर्म आणि श्रावकधर्मातील सर्व व्रते - अतिचार यांचे कंटाळवाणे (अनभिज्ञ व्यक्तीस नक्कीच) वर्णन ; महावीरचरित्र सांगताना, 'त्यांनी विवाह करणे का नाकारले' या गोष्टीवर फार भर आणि उपदेश त्रोटक देणे. थोडक्यात काय, तर कोणते मुद्दे निवडायचे आणि कोणते गाळायचे हा विचार निबंधलेखनापूर्वी करून ज्यांनी नीट नियोजन केले, त्यांचे निबंध चांगले ठरले. तरीही दहा फुलस्केप लिहिणे काही सोपे काम नाही. सर्वच्या सर्व ३९ निबंधलेखकांचे त्याबद्दल अगदी मनापासून अभिनंदन ! या निमित्ताने निबंधात मांडलेल्या काही विशेष गोष्टी येथे नमूद करते १) कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम द्वारा 'जेनेलिसा' नावाची मुलगी लेखिकेकडे राहिली. सतत प्रश्नांचा भडिमा करणारी ही चोखंदळ मुलगी. लेखिकेने अखेरीस तिचा नामकरण विधी केला आणि नवे नाव ठेवले 'जिज्ञासा'. २) एक लेखिका ‘अजनबी'ला जैन धर्म सांगताना स्वत:च अंतर्मुख होते आणि स्वत:च्या जैनधर्मी असण्याचा पुनर्विचार करू लागते. ३) कौटुंबिक, सामाजिक आघातांनी त्रस्त झालेली एक अ-जैन स्त्री आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचते. आपली श्रावक लेखिका तिला साध्वीजींकडे नेते. त्यांच्या उपदेशाने ती स्त्री साध्वीदीक्षा घेते. ही हृदयस्पर्शी सत्यघटना एका निबंधात चांगल्या प्रकारे नोंदविली आहे. ४) पर्युषणाचा अंतिम दिवस आहे. आलोयणेला अलोट गर्दी झाली आहे. रस्त्यात थांबून एक जैनेतर स्त्री आपल्या लेखिकेला विचारते, 'यहाँ कुछ फ्री में मिल रहा है क्या ? इतनी भीड क्यों है ?' लेखिका मोठी चतुर. ती तत्परतेने उत्तर देते - 'यहाँ मुफ्त में क्षमा मिल रही है । मेरे साथ अंदर चलो ।' मांगलिक घेऊन श्राविका त्या स्त्रीला घरी नेते. जैन धर्माची ओळख करून देते. ५) लेखिका एका व्यक्तीच्या संथाऱ्याच्या दर्शनासाठी चालली आहे. ट्रेनचा प्रवास सुरू आहे. एक समवयस्क जैनेतर स्त्री गाडीत चढते. शेजारी बसते. तिचे वडील गंभीर आजारी असतात. लेखिका संथाऱ्याविषयी समजावून सांगते. दुसरी स्त्री प्रतिक्रिया देते - 'खाना नहीं, पीना नहीं, दवा नहीं । जानबूझकर आदमी को मरने के लिए छोड देनेका कैसा धर्म है ये ?' त्यानंतर लेखिका जैन धर्म समजावते. ६) केवळ एकाच निबंधात हा मुद्दा विस्ताराने मांडला गेला. लेखिका म्हणते, 'झाडावेलींवर आपल्या

Loading...

Page Navigation
1 ... 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72