Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 49
________________ प्रदीर्घ कादंबरी आणि 'धूर्ताख्यान' नावाचे व्यंग-उपहासप्रधान खंडकाव्य लिहिले. डॉ. घाटगे म्हणतात, “In it's classical form, as represented by Haribhadra's Samaradityakatha and Dhurtakhyana, Jain Maharashtri comes nearest to pure Maharashtri" (Intro.p.10) आठव्या शतकात जर महाराष्ट्री भाषेने 'अभिजात' (classical) हा दर्जा मिळविला असेल तर त्याच महाराष्ट्री-अपभ्रंशातून बनलेल्या मराठीचे अभिजातत्व वस्तुत: जन्मसिद्धच म्हणावे लागेल. महाराष्ट्री भाषा अपभ्रंश अवस्थांतरातून गेल्यावर ज्या रूपात अवतरली ती आधुनिक मराठी होय. 'प्राकृतशब्दमहार्णव' नावाच्या प्राकृतहिंदी कोशाचे संपादक पं. हरगोविंददास सेठ म्हणतात - 'महाराष्ट्री अपभ्रंश से मराठी और कोंकणी भाषाएँ उत्पन्न हुई ।' (प्रस्तावना पृ.५५) सारांश काय, तर मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध करण्यास जर जैन माहाराष्ट्री भाषा सरसावली, तर एकाही शतकाचे किंबहुना शतकार्धाचेही अंतर न पडता, सलग दुसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचा तिचा साहित्यिक प्रवास लक्षणीयपणे नोंदवता येतो. ... (४) प्राकृतच्या व्याकरणकारांनी महाराष्ट्री प्राकृतला दिलेले महत्त्व : ___ चण्ड, वररुचि, कात्यायन, हेमचन्द्र, त्रिविक्रम, वसंतराज, मार्कण्डेय, लक्ष्मीधर – या प्रमुख वैयाकरणांनी लिहिलेल्या विविध प्राकृत भाषांच्या व्याकरणात महाराष्ट्रीला सर्वाधिक महत्त्व दिलेले दिसते. वररुचीचे व्याकरण ६ व्या शतकातील आहे. त्याच्या १२ परिच्छेदांपैकी ९ परिच्छेद ‘सामान्य प्राकृत'वर आधारलेले आहेत. उरलेल्या सर्व प्राकृतांचे विवेचन थोडक्यात करून तो १२ व्या परिच्छेदाच्या ३२ व्या सूत्रात म्हणतो, 'शेषं महाराष्ट्रीन'. याचा अर्थ असा की, ६ व्या शतकात महाराष्ट्री प्राकृत अत्यंत विकसित स्वरूपात होती. किंबहुना सामान्य प्राकृत = महाराष्ट्री - असे समीकरणही दृढ झाले होते. डॉ.ए.एम्.घाटगे यांनी एक स्वतंत्र शोधनिबंध लिहून वरील समकरणास पुष्टी दर्शविली आहे. (Maharashtri Language and Literature - Journal of Uni. of Bombay, May 1936). (५) अभिजात संस्कृत नाटकात स्त्रियांची पद्ये महाराष्ट्रीत : भासाच्या नाटकातील प्राकृतचे वर्णन डॉ. घाटगे pre-classical Prakrit' असे करतात. त्यानंतरच्या नाटकातील प्राकृतला ते classical Prakrit' म्हणतात (Intro.p.11). कालिदास, हर्ष, विशाखदत्त, भवभूति, राजशेखर - यांच्या नाटकांमध्ये सामान्यत: गद्यभाग शौरसेनीत तर पद्यभाग महाराष्ट्रीत आहे. वस्तुत: भरताच्या नाट्यशास्त्रात महाराष्ट्रचा निर्देश नसतानाही कालिदासासारख्या महाकवीने (काळ-अंतिम मर्यादा-४ थे-५ वे शतक) गीतांसाठी केलेला महाराष्ट्रीचा अंगीकार 'महाराष्ट्री' भाषेचे अभिजातत्व सिद्ध करतो. (६) प्राकृतातील सट्टक, प्रहसन, भाण इ. नाट्यप्रकारातून लोकनाट्यांची निर्मिती : _ 'सट्टक' म्हणजे पूर्ण प्राकृत भाषेतील नाटक. ही परंपरा ९ व्या शतकात राजशेखर कवीने 'कर्पूरमंजरी' पासून सुरू केलेली दिसते. शृंगार, हास्य आणि अद्भुत हे यातील मुख्य रस. 'आनंदसुंदरी' या सट्टकाचे कर्ते घनश्याम (इ.स.१७००) 'महाराष्ट्रचूडामणि' आणि 'सर्वभाषाकवि' होते. 'रंभामंजरी' नावाच्या नयचन्द्रकृत सट्टकात (इ.स. १४ वे शतक-उत्तरार्ध) दिसणारी महाराष्ट्री-अपभ्रंश खासच मानली पाहिजे. जसे - जरि पेखिला मस्तकावरी केशकलापु तरी परिस्खलिला मयूरांचे पिच्छप्रतापु ।। (अंक १) मत्तविलास-प्रहसन आणि हास्यचूडामणि-प्रहसन ही दोन मुख्य प्रहसने, तसेच भाण-डिम इ. प्राकृत नाट्यप्रकार यांना आधुनिक मराठीतील तमाशा, वगनाट्ये इ.ची प्रेरणास्थाने मानावयास हरकत दिसत नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आज दिसणाऱ्या वासुदेवांची परंपरा आर्ष जैन महाराष्ट्रीतील 'वसुदेवहिंडी'

Loading...

Page Navigation
1 ... 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72