Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune
View full book text
________________
दहाव्या शतकाच्या आसपास भारतातून बौद्धधर्म जवळजवळ हद्दपार झाला. हिंदच्या बाबतीत काही वेगळेच घडले. जैन आणि बौद्ध धर्मामध्ये जाऊ पाहणाऱ्या स्त्रियांना व शूद्रांना व्रतवैकल्याचे व भक्तीचे मार्गदर्शन करून त्यांना हिंदूधर्मात रोखून ठेवले.
सर्व धर्मांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरी अशा विद्यांचा पगडा कायम आहे. आजच्या घडीला संपूर्ण समाजाच्या परिप्रेक्ष्येत असाच दुहेरीपणा चालू आहे. प्रगतशील विज्ञानयुगात एकीकडे आपण विज्ञानाद्वारे ग्रहांवर पोहचत आहोत. वेगवेगळ्या ज्ञानशाखा उदयाला येत आहेत. निसर्गाचा तसेच मनुष्यवस्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चालू आहे. पण तरीही अंधश्रद्धेच्या आहारी जाणारा फार मोठा वर्ग आजही दिसतो आहे. म्हणजेच जैनग्रंथातच अशी दहेरी व परस्पविरोधी वचने नाहीत तर प्रत्यक्ष समाजातही तेच चालू आहे किंबहुना वाढत आहे. मनुष्यप्रण्याचा मानसिक कमकुवतपणा' व 'दुसऱ्याच्या आहारी जाण्याची वृत्ती' या दोन गोष्टींचा फायदा सर्व प्रसारमाध्यमे घेत आहेत. त्याला यथेच्छ खतपाणी घालून, अंधश्रद्धेचा वृक्ष अधिकाधिक फोफावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तरीही काळीजाद, व्यभिचार, हिंसा यावर आधारित ज्या विद्या आहेत त्यांच्या अतिरेकावर लगाम लागेल, असा आशावाद नक्कीच ठेवू या !!!
**********
(५) आजची जैन जीवनपद्धती व वनस्पतिसृष्टी व्याख्यान : डॉ. नलिनी जोशी
शब्दांकन : डॉ. अनीता बोथरा
सूत्रकृतांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधातील तिसऱ्या अध्ययनाचे नाव आहे 'आहारपरिज्ञा'. विश्वातील सर्व जीवजाती कोणकोणत्या प्रकारचा आहार घेतात ते या अध्ययनात विस्ताराने सांगितले आहे. एकेंद्रियांपासून सुरवात केली असली तरी वनस्पतिसृष्टीचा विचार सर्वात प्रथम केला आहे. अध्ययनाचे एकंदर प्रतिपाद्य पहात असताना, अध्ययनाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने जे विचारमंथन झाले, त्याचा सारांश या लेखात प्रस्तुत केला आहे.
___ आचारांग, सूत्रकृतांग, प्रज्ञापना, जीवाभिगम इ. अर्धमागधी प्राकृत ग्रंथात व मूलाचार, गोम्मटसार (जीवकांड) इ. शौरसेनी ग्रंथात वनस्पतींचे विवेचन सूक्ष्मतेने व विस्ताराने आढळते. वनस्पतींना एकेंद्रिय जीव मानल्यामुळे, वनस्पतींकडे पाहण्याची दृष्टीच अतिशय भावनात्मक आहे. वनस्पतींचा गति, जाति, योनि, लिंग, जन्म, इंद्रिय, शरीर इ. अनेक दृष्टींनी, खोलवर विचार केला आहे आणि म्हणूनच वनस्पतींकडे पाहताना हिंसा-अहिंसेची दृष्टी केंद्रस्थानी ठेवली आहे. 'सर्वजीवसमानतावाद' या तत्त्वानुसार, 'वनस्पती कनिष्ठ व मनुष्य श्रेष्ठ' असेही पाहण्याची जैनांची दृष्टी नाही. परिणामी आचारांगात वनस्पती व मनुष्यांची तुलना करून दोघांना समान पातळीवर आणून खले आहे. __'जीवो जीवस्य जीवनम्' व 'परस्परोपग्रहो जीवनाम्' या सूत्रांनुसार निसर्गातील प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाच्या आधारावर जगत असतो. जगण्यासाठी प्रत्येक जीवाला कोणता ना कोणता आहार घ्यावाच लागतो. जैन परंपरेत मांसाहार तर सर्वथा निषिद्धच मानला आहे व शाकाहारातही अनेक नियम तसेच मर्यादा सांगितल्या आहेत.
शाकाहार म्हणजे वनस्पतिसृष्टीचा आहार. दैनंदिन व्यवहारात व स्वयंपाकघरात वनस्पतींच्या छेदन-भेदनाशिवाय आपले कोणतेही काम होत नाही. तरीही कांदे, बटाटे इ. कंदमूळांचा त्याग, मोड आलेल्या कडधान्यांचा त्याग, बहुजीवी वनस्पतींचा त्याग, पालेभाज्यांचा त्याग अशाप्रकारे धार्मिक दृष्टीने त्याग करण्याचेजैन समाजात प्रचलनही आहे. म्हणजेच वनस्पतींचा उपयोग करताना अतिशय सावधानतेचा इशारा तर आहेच शिवाय मर्यादाही करण्यास सांगितल्या आहेत. 'वनस्पतींमधील चैतन्य' या दृष्टीने मर्यादेच्या रूपाने त्यांच्या रक्षणाची असलेली दृष्टी, ही एक बाजू झाली. परंतु फक्त रक्षणच करून चालेल काय ? हा विचारणीय मुद्दा आहे. कारण रक्षण करायचे म्हटले तर कितीही कमी खायचे ठरविले तरी आहाराशिवाय आपण जिवंत राह शकत नाही. वनस्पतींचा उपयोग तर प्रतिदिन