Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 39
________________ आता हा हा म्हणता केले गोळा शिष्य सहस्रात केवळ उपजीविकाप्राप्ति हेतु आहे उपदेश करण्यात, कसे म्हणता तुम्ही नाही त्यांना मोह नि ममत्व ? आर्दक : उत्तर - उपदेशाचे कारण एकच 'भव्य जीव हित'. मार्ग हिताचा ऐकून सारे होतात प्रवर्जित भाषेच्या गुणांनी नटले प्रवचन निग्रंथ मार्ग 'अहिंसामय संयम' हा सांगति अरिहंत पाहून ठरवति जनसमुदाया दृष्टिक्षेपात होईल अथवा नाही सार्थक सांगूनि स्व-मत व्यवहारास्तव केले काही तरी नाही बिघडत कर्मबंध, वेदन, निर्जरा तीनच समयात. केवलज्ञाना सत्यस्वरूप जे झाले अवगत, त्रस-स्थावर जीवांना पाहिले, सर्व विश्वव्याप्त. यथावादी-तथाकारी ज्ञातपुत्र होऊन परार्ध प्रवृत्त शिथिलाचारी धर्मा केले पुन: परिष्कृत ब्रह्मचर्य नि अपरिग्रहास करून विभक्त व्यवस्था दिली साधु, श्रावका - महाव्रत, अणुव्रत. गोशालक : आजीवक मताचे चारित्र-वर्णन स्व-मताचे करण्या वर्णन गोशालक झाला उद्यत, वर्णन केले चारित्राचे रहस्य उलगडत सेवन करतो आम्ही बीजकाय, आधाकर्मी, सचित्त जलशित (इतकेच काय ?) स्त्री-सेवन करून ही आम्ही पापलेप रहीत. आर्द्रक : उत्तर - आर्द्रक मुनि ही उत्तरले मग परखड भाषेत (शब्दांत) भिक्षु तर सोडाच तुम्हा, गृहस्थही नाही म्हणवत अणुव्रती त्या गृहस्थासही परस्त्री वर्जित म्हणे, आतापन, तप, अस्नानाने होते कर्म निर्जरीत ? अशा युक्तिवादाने तर, अज्ञानच तुम्ही करता प्रस्तुत उपजीविकेसाठी कशास फिरता भिक्षा मागत ? व्यर्थ भिक्षुकी केली तुम्ही सोडूनि गणगोत अहो ! भिक्षेचा हेतु सर्वथैव विरमण प्राणातिपात. (गोशालक - तुम्ही आमची निंदा करता.) आर्द्रक : उत्तर - बाह्यरूप, वेषाची आम्ही निंदा नाही करत (पण) दृष्टिच असे जर मिथ्या कसा होईल बरे दुःखांत सम्यक् दृष्टि महावीरांना दूषणे देत, सिद्धच केले तुमचे मत, कसे 'मिथ्या संस्थित' गोशालक : आक्षेप - विद्वानांमध्ये प्रश्नोत्तर नि शास्त्रचर्चेला महावीर भीतात, पराजित जर केले कोणी तर होऊ लज्जित

Loading...

Page Navigation
1 ... 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72