Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 20
________________ (रति), घडले नाही तर बेचैनी (अरति), सरळ सरळ तोंडावर बोलण्याचे धाडस नसेल तर त्यांच्या अपरोक्ष निंदा (परपरिवाद), एकमेकात भांडणे लावण्याची व चुगली करण्याची वृत्ती (कलह, पैशुन्य), व्यक्ती किंवा वस्तूच्या प्रति आसक्ती (राग) किंवा घृणा (द्वेष), खोटा दोषारोप (अभ्याख्यान), 'मी त्यातला नाहीच' असा भास निर्माण करण्यासाठी कपटपूर्वक खोटे बोलणे (मायामृषावाद) इ.इ. पण सर्वात घातक म्हणजे red signal च जणू असे पापस्थान म्हणजे 'स्थियादर्शनशल्य'. अर्थात् चुकीच्या धारणा मनात स्थिर करणे. या भ्रांत धारणा व्यावहारिक पातळीवर असोत की सामाजिक अथवा कौटुंबिक पातळीवर असोत की धार्मिक अथवा आध्यात्मिक पातळीवर असोत ; अनेक बाबतीत, विविध क्षेत्रात अशा चुकीच्या धारणा आपण पसरवत असतो. परंतु पसरवणाऱ्या व्यक्तीला आपण चुकीचे करत आहोत ही जाणीवच नसते. जाणीव करून दिली तर तो मान्य करत नाही. कोणत्याही चुकीच्या धारणा कशा वाढणार नाहीत याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. इतकेच नव्हे तर इतरांचा धर्म अथवा दर्शन म्हणजे 'मिथ्यादर्शन' असा धर्माने लावलेला सांप्रदायिकी व अभिनिवेशी अर्थही आपण लावायला नको. चुकीच्या मान्यता स्वत: जोपासायच्या नाहीत व दुसऱ्यालाही खतपाणी घालून तो विषवृक्ष पसरवू द्यायचा नाही. वेळेवारीच सुसंवादाद्वारे त्या संपवून टाकायच्या. एकंदरीतच ही अठरा पापस्थाने म्हणजे सर्व संसारी जीवांच्या स्वाभाविक प्रवृत्तीच आहेत. अंतर्मनात जे जे दृष्ट विचार आपण साठवित असतो ते अठरा पापस्थानांच्या रूपाने प्रकट होत असतात. म्हणूनच एकच व्यक्ती सभा-संमेलनात, कुटुंबात व एकांतात वेगवेगळी दिसते. खऱ्या उर्मी, अंत:प्रेरणा, दुर्गुण प्रसंगानुसार बाहेर पडत असतात. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचे दोन स्तर आपल्याला दिसतात. १) मन-वचन-कायेच्या सर्व वैशिष्ट्यांसह असलेले त्याचे बाह्य व्यक्तिमत्व, २) आश्रवचित्तानेयुक्त आंतरिक व्यक्तिमत्व. ही अठरा पापस्थाने त्याच्या अंतर्मनात किती सौम्य, मध्यम व तीव्र आहेत यावरून त्याच्या आंतरिक व्यक्तिमत्वाची ओळख होते. अशा प्रकारचे मानसशास्त्रीय विश्लेषणही या अध्ययनात पापस्थानांच्या रूपाने आले आहे. आजच्या आधुनिक जगात personality development च्या आधारे आपले बाह्य व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होईल परंतु भ. महावीरांनी अठरा पापस्थानांच्या त्यागरूपाने आंतरिक व्यक्तिमत्व सुधारण्याची गुरुकिल्ली दिलीआहे. प्रत्येक संसारी आत्मा हा असत् अनुष्ठानात मग्न, चुकीच्या धारणांनी युक्त, पक्षपाती, अज्ञानात गुंग व बेसावध असतो. अशा परिस्थितीत आपल्या मनात शंका निर्माण होईल की अशा प्रकारचा आत्मा फक्त मनुष्याचाच असतो का ? तर त्याअर्थाने पापबंध फक्त मनुष्यच करतात. इतर अप्रगत जीव, ज्यांना मन नाही, भाषाज्ञान नाही, झोप नाही, स्वप्न नाही असे निगोदी जीव पापबंध करतच नसावेत ! त्याचे समाधान असे आहे की - सर्व संसारी जीव हे षट्जीवनिकायांच्या (अर्थात् पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु, वनस्पती व त्रसजीव) संपर्कातच असतात. एकटा जीव सर्वांपासून दूर, वेगळा राहूच शकत नाही. आहारासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. कोणत्याही जीवाचे संसारात राहणे हेच अव्रताचे म्हणजे अप्रत्याख्यानाचे कारण आहे व तोच बंधाचा हेतू आहे. म्हणून कोणतीही जमिन नसलेला निगोदी जीव असो किंवा पंचेंद्रिय संज्ञी (मनसहित) मनुष्य असो, सर्वांना पापबंध होतोच. अप्रत्याख्यानाने होणाऱ्या पापबंधापासून दूर राहण्याचा उपाय म्हणजे प्रत्याख्यान'. इतर योनींपेक्षा विचारशील मानवी योनीतप्रत्याख्याची सर्वाधिक शक्यता व क्षमताही आहे व म्हणूनच 'अठरा पापस्थानांपासून विरत राहण्याचा संकल्प' येथे सांगितला आहे. प्रत्यक्ष आचरणात प्रत्याख्यानाचे पालन करण्यासाठी साधूंच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे 'आत्मतुला' अर्थात् ‘आत्मोपम्यभाव' सांगितला आहे. आपल्या आत्म्यासमान दुसऱ्याचा आत्मा आहे, ही जाणीव ठेवून हिंसा, शासन, दंड, कष्ट, परिताप कोणासही करू नका, देऊ नका. म्हणून महाव्रत, समिति, गुप्ति इ.च्या रूपाने तसेच छोटे-मोठे नियम घेऊन, शपथ व शुभ संकल्पांच्या रूपाने प्रत्याख्यानाशी जोडला आहे. पण प्रत्यक्ष जैन आचारात मात्र प्रत्याख्यान हे प्राय: आहाराशीच संबंधित असे दिसून येते. परंतु आहार हे त्याचे

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72