Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune
View full book text
________________
फक्त आंशिक अंश आहे. पापस्थानाचे जे मूळ कषाय ते दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण चित्तात शिरलेले कषाय अथवा वैरभाव दीर्घकाळ व खोलवर राहतात. त्यांना सहजी दर करता येत नाही. जसे 'वाळा' नावाच्या गवताची सुगंधित मुळे एकमेकांत गुंतल्यामुळे, सहजासहजी सर्व उपटली जात नाहीत. उपटताना सूक्ष्म मूळ जरी राहिले तरी पुन्हा नवनिर्मिती होते. तसे कषाय असतात. निघून गेल्यावरही सूक्ष्मरूपानेजरी राहिले तरी निमित्त मिळताच वाढीस लागतात. म्हणून कषायांवर नियंत्रण ठेवता आलेच पाहिजे. आपल्या चित्तवृत्ती अशा पातळीवर असाव्यात की काही असो किंवा नसो, आपल्या आत्म्याचा आलेख हा एकसारखा दिसला पाहिजे. बाह्य वस्तूंची व्यवस्थापन पद्धती तर आपण शिकतच असतो पण भ. महावीरांनी अठरा पापस्थानांच्या त्यागाच्या रूपाने आंतरिक चित्तवृत्तींची व्यवस्थापन (management) पद्धती सांगितली आहे.
परिस्थिती, काळ, वेळ, संधी, दृष्टी इ. पाहून म्हणजेच पारिभाषिक भाषेत द्रव्य-क्षेत्र-काल-भावानुसार कोणत्या वेळी कशाला महत्त्व द्यायचे, ते तुम्हीच ठरवा. संकल्प कशात करायचा व कशात नाही तेrelatively ठरेल. 'हवा' हा जसा दुराग्रह' आहे तसा 'नको' हाही ‘हटाग्रह'च आहे. नियमातले गुंतवणेपण व त्याने होणारे अनर्थही टाळू या. जीवन प्रसंगा-प्रसंगाने साधेपणाने जगू या. ____ आजच्या व्यवहारात, त्या त्या अवस्थेत, त्या त्या भूमिकेत, अर्थात् मुलांविषयी असो, कुटुंबाविषयी असो, स्वत:विषयी असा अथवा धार्मिकतेविषयी असो, नेमके कुठे थांबले पाहिजे - याचे भान, याची जाणीव म्हणजे प्रत्याख्यान. जसा करियरचा उत्कर्षबिंदू असतो, तसा थांबण्याचाही उत्कर्षबिंदू असावा आणि म्हणूनच संलेखना अर्थात् समाधिमरणाच्या प्रसंगीही प्रत्याख्यान धारण करताना सर्वप्रथम अठरा पापस्थानांचाच त्याग करण्याचा निर्देश आहे. कारण अठरा पापस्थानांच्या त्यागानेच नैतिक व आध्यात्मिक उन्नती होणार आहे, जी केवळ आहारत्यागाने होणार नाही.
आपण सर्व जीवांच्या संपर्कात राहतो व जगतो. त्यामुळे सर्व जीव अर्थात् षड्जीवनिकाय, हे अप्रत्याख्यानी जीवाला जरी संसारभ्रमणाचे हेतू ठरत असतील तरी प्रत्याख्यानी जीवाला तेच षड्जीवनिकाय मोक्षाचे कारणही ठरतात. सूत्रकृतांगसूत्राच्या टीकाकारांनी अशा भक्कम आशावादाने प्रत्याख्यानासंबंधीच्या विचारांचा उपसंहार क्ला आहे.
**********
(८) लेप गृहपति : एक आदर्श श्रावक
संगीता बोथरा सूत्रकृतांग या द्वितीय आगमग्रंथातील द्वितीय श्रुतस्कंधातील 'नालंदीय' नामक ७ व्या अध्यायात 'लेप' श्रावकाचे वर्णन आले आहे. या अध्ययनात गौतम गणधर आणि पापित्यीय पेढालपुत्र उदक यांच्यातील सुप्रत्याख्यान आणि दुष्प्रत्याख्यान याच्या संदर्भातील चर्चासत्राचे विस्तारपूर्वक वर्णन आले आहे. हे चर्चासत्र ‘लेप' गृहस्थाच्या 'शेषद्रव्या' नामक उदकशालेत झाले. सूत्रकृतांगाच्या दोन्हीही श्रुतस्कंधात एकमात्र ‘लेप' श्रावकाचेच वर्णन आढळते.
लेप' हा आदर्श श्रमणोपासक होता. राजगृहाच्या 'नालंदा' नामक उपनगरातील समृद्धशाली, तेजस्वी, विख्यात असा हा 'लेप' श्रावक. १२ व्रतांचा धारक आणि त्यांचे पालन करणारा ! आजदेखील आपल्यासारख्या श्रावक-श्राविकांचा आदर्श आहे.
लेप' श्रावकाकडे विपुल प्रमाणात धन, धान्य, संपत्ती तर होतीच शिवाय विशाल आणि बहुसंख्य प्रमाणात भवन, शयन, आसन, यान, वाहन तसेच दास, दासी, गायी, म्हशी आदि होते. अनेक लोक मिळून देखील त्याचा पराभव करू शकत नव्हते. तो धनोपार्जनास उपयुक्त अशा सर्व उपायांचा ज्ञाता आणि त्यांचा प्रयोग करण्यात कुशल होता.
यावरून लक्षात येते की, लेप' श्रावक गर्भश्रीमंत, व्यवहारकुशल, पराक्रमी, रोजगार उपलब्ध करून देणारा,