________________
महावीरचरित्र
हिंदुस्थानांत आणि विंध्यपर्वताच्या खाली झाला नव्हता. पंजाबांत स्थिरस्थावर होऊन बराच काल लोटल्यानंतरच आर्यानी मध्यभागांत आणि दक्षिणेत भाकमण केलें. ऋग्वेदकालीं सरस्वती आणि दृषद्वती या दोन नद्यांच्या मध्यवर्ती भागांत आर्याचे केंद्रस्थान होतें. ब्राह्मणकालांत हे केंद्रस्थान पूर्वेकडे सरकत जाऊन कुरुक्षेत्राच्या भागांत आलें. अथर्वाच्या कांहीं भागांत हे भाग ऋग्वेदाइतकेच जुने आहेत- रोगराई मगधदेशांत जाऊं दे असे म्हटले आहे. ऐतरेय ब्राह्मणांत दक्षिणेतील आंध्र वगैरे लोकांचा उल्लेख बहिष्कृतासारखा आहे. ऋग्वेदकालापासून ब्राह्मणकालापर्यंत आर्याची वस्ति मध्यदेशापर्यंतच येऊन ठेपली होती. पूर्व व दक्षिणभागांत कांहीं आर्येतर लोक रहात होते. पुढे म्हणजे उपनिषदकालांत आर्याचा प्रसार सर्व हिंदुस्थानभर झाला असावा असें दिसतें.
आतां ऋग्वेदकालापासून आर्याची धार्मिक भावना व कल्पना काय होती तें आपण पाहूं. ऋग्वेदकाली धार्मिक कल्पना फारशी गुंतागुंतीची नव्हती. धर्मसंबंधी कल्पनाची ती प्रथमावस्था असल्यामुळे, धर्माविषयीं त्यांची चिकित्सकबुद्धि अद्यापि जागृत झाली नव्हती. तथापि त्या वेळच्या धार्मिक श्रद्धेत पुरोहितांच्या धूर्ततेची छाप मात्र पडलेली दिसून येते. त्यावेळचे धार्मिक आचारविचार अगदी साधे होतें. सृष्टीतील नैसर्गिक शक्तीवर मनुष्यत्वाचा आरोप करून आणि त्यांच्या ठिकाणी दैवी शक्तीची कल्पना करून त्यांचीच ते प्रार्थना करीत असत. यांत द्यावा, पृथ्वी, वरुण, इंद्र, उषस् इत्यादि देवतांची स्तुतीच आहे. वरुणाला थोडेसे नैतिक अधिष्ठान मिळालेले आहे. इंद्र शत्रूंचा संहारक असून तो भक्तांना पाऊस वगैरे पाठवितो. भक्तानें कांहीं मागितलें तरी तें द्यावयाची त्यांची तयारी असते. उषेची स्तुति फारच रम्य आहे, आणि ती लिहिणाऱ्या कवीच्या कल्पनाविलासाचे कितीहि कौतुक केलें तरीहि तें घोडेंच वाटते. हे देव पूजेनें प्रसन्न होऊन काहीही द्यावयास तयार असत, आणि यज्ञयागांची कल्पना त्यांची कृपा संपादण्यासाठींच प्रसृत झाली होती यांत शंका नाहीं. भक्ताने देवीची उपासना कशी करावी हे माहित झाल्यानंतर देव त्यांच्या आधीन होतात. धर्म विषयक कल्पनांच्या प्रगतीतील ही एक पुढची पायरी होय. या कल्पनेमुळे पुरोहितांना महत्त्व प्राप्त झालें. यज्ञांत देवांना दूध, तूप, धान्य, मांस, सोमरस इत्यादि पदार्थ बली देत असत. देवांना संतुष्ट करावयाची गुरुकिल्ली एकदा ( ४ )