________________
प्रस्तावना.
भारतीय संस्कृतीत भौतिकाला केव्हांही गोण स्थानच मिळालेले आहे. हिंदवासीयांची आस्तिक्यबुद्धि अतिप्राचीन काळापासून दृढमूल झालेली असल्यामुळे पारलौकिक सुखाची श्रद्धा जन्मापासूनच त्याच्या हाडीमासी खिळलेली असते. त्यामुळे परलोकी आपण सुखी करें होऊं या गोष्टीकडेच लोकांचं लक्ष लागून राहिले. इंद्रियें देहव्यवहाराची केवळ उपकरणे असल्यामुळे आणि हा देह मरणानंतर येथेंच सोडून द्यावयाचा असल्यामुळे इंद्रियलोलुपता आणि शारीरिक मोह ही परलोकहिताला अयोग्य ठरली. मृत्यूच्या पलीकडे आत्मा हा एकटाच अबाधित असल्यामुळे त्याला इहपरलोकीं सुख व समाधान कसें होईल या गोष्टीकडेच प्रत्येक जाणत्या माणसाचे विचार लागून राहिले. एतद्देशीय प्रत्येक धर्मात हीच विचारसरणी आढळून येईल यांत संशय नाहीं. आत्म्याचे अमरत्व ग्राह्य ठरल्यानंतर नीतिधर्माची आणि जगांतील पारस्परिक जवाबदारीची उपपत्ति सुलभरीतीने लावता येते. आणि म्हणूनच या देशांत भौतिकापेक्षां अध्यात्मिक संस्कृति श्रेष्ठ ठरली आहे.
भारतीय संस्कृतीचें हेंच वैशिष्टय होऊन गेल्यामुळे, मानव जातीची आध्यात्मिक तृष्णा शमविण्याकरिता हिंदुस्थानात अनेक धर्म उत्पन्न झाले. त्यांपैकी कांहीं पूर्वीच्याच स्वरूपांत आजही राहिले आहेत; कांहींत कालानुरूप आणि परिस्थितीला अनुसरून बदलही झालेला आहे; आणि कांहीं नामशेषही होऊन गेले आहेत. एकामागून एक असे अनेक धर्म येथे उदयाला आल्यामुळे भारतभूला धर्माचे माहेरघर समजण्यांत यावे ह्यात नवल नाहीं. प्रत्येक धर्माचे ध्येय त्याची मांडणी परिस्थितीला अनुसरून इतर धर्मीहून कांहींशी वेगळी असली तरी मनुष्याचा आयात्मिक हव्यास पूर्ण करणे आणि त्या दृष्टीनें जगांतील सर्व घडामोडीची उपपत्ति लावणे हेच आहे. त्यामुळे हिंदुस्थानांतील प्रत्येक व्यक्तिमात्राच्या जीवनाला धर्माची कायमची सांगड लागून राहिली आहे. त्याच्या जीवनावर परिणाम करणारी धर्म ही एक मोठी शक्तीच झालेली आहे. त्याच्या जीवनक्रमाला हे विशिष्ट वळण फार प्राचीन काळापासून लागत आले आहे. व्यक्तिगत आयुष्यक्रमावर प्रभाव पाडणारे एखादें विशिष्ट तत्व राष्ट्रीय जीवनक्रमांत आढळून आल्यावांचून राहणार नाहीं. जगातील अनेक देशांच्या
( १ )