________________
महावीरचरित्र
या पुस्तकांतील कांहीं भाग: साधारण माणसाला असंभवनीय वाटतील व श्रद्धायुक्त वाचकांनाच अशा कथा आवडतील. पण हा भाग या चरित्रांतील महस्वाचा भाग नव्हे. तर महावीरस्वामींच्या कालांतील धर्माची अवनति आणि ती दूर करण्यासाठी त्यांनी जी तत्वें प्रतिपादन केलीं तीं तत्वें, यांचा अभ्यास करण्यास हे पुस्तक उपयोगी आहे, याच गोष्टींत या पुस्तकाचें महत्व आहे. रा. गांधी यांनी हे पुस्तक लिहिताना अशा जिज्ञासूंना शक्य तेवढी मदत करण्याचा हेतु आपल्या मनांत सदोदित ठेविला असावा असे स्पष्ट दिसतें. माझ्यामतें, हा हेतु त्यानी पुष्कळ अंशांनें साध्यहि केला आहे. महावीरस्वामींचें चरित्र म्हणजे जैनधर्माचें प्रतिपादन. स्वामींच्या जन्मापासून निदान ते दक्षिा घेईपर्यंत, किंत्रहुना त्यांना केवलज्ञान प्राप्त होईपर्यंत, मनुष्यजन्मांत साधारणपणे येणारे अनेक अनुभव त्यांना आले असतील आणि त्यांच्या अनुभवाच्या अशा गोष्टी जर कोणी लिहून ठेविल्या असत्या तर त्या मनोरंजकच नव्हे तर बोधप्रदहि झाल्या असत्या. परंतु अशा गोष्टींना महावीरस्वामींनी अथवा त्यांच्या शिष्यांनी महत्त्व दिले नाहीं. कारण जैन सिद्धांताचे पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या कार्याच्या मानानें, त्यांच्या लौकिकजीवनांतील लहानसान गोष्टी कांहींच नव्हत्या. त्यांचे जीवन म्हणजे जैनधर्माची प्रभावना त्यापलीकडे कांहीं नाहीं किंवा त्यापलीकडे कांहीं असणेंच शक्य नाहीं, अशा भावनेने आजवर सर्वांनीं त्यांच्या जीवनाबद्दल विचार केला आहे. अर्थातच या चरित्रांत जैनधर्माच्या सिद्धांतांचं संक्षिप्त विवरण हाच मुख्य हेतु असावा हे स्वाभाविक आहे.
असे असले तरी, वीरचरित्राभोवती कालाच्या प्रभावाने जमलेले अनैतिहासिक धुके नाहीसे करून, ऐतिहासिक दृष्टीने खन्या ठरण्यासारख्या गोष्टी निश्चित करण्याचा रा. गांधी यांनी प्रयत्न केला असून त्याचा उपयोग वाचकांना चांगला shoorसारखा आहे. वीरकार्ल न् समाज, राज्यव्यवस्था व वैदिक आणि बौद्धमतांतील कोणत्या वैगुण्यामुळे जैनमतास त्यावेळीं विशेष महत्व आलें हें रा. गांधी यांनी शक्य तेवढ्या कसोटीनें वर्णिले आहे. यामुळे प्रस्तुत चरित्र कोणा - लाहि वाचनीय वाटेल यांत शंका नाहीं.
बेळगांव ता० १३/६/३१
.
}
(२)
आ. बा.
लठ्ठे.