Book Title: Acharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth Author(s): Jinwani Jirnoddharak Sanstha Faltan Publisher: Jinwani Jirnoddharak Sanstha FaltanPage 16
________________ परमपूज्य आचार्यश्रींच्या ध्वनिमुद्रित मौलिक उपदेशातील अमोल आदेश ( श्री क्षेत्र कुंथलगिरी येथे आचार्यश्रींच्या आपल्या सल्लेखना - महाव्रताच्या २५ व्या दिवशी गुरुवार दिनांक ८-९-५५ रोजी सायंकाळी ५-१० ते ५ - ३२ पर्यंत २२ मिनिटे मराठी भाषेतून जो विश्वकल्याणकारी उपदेश दिला तो ध्वनिमुद्रित ( Record ) करण्यात आला आहे त्यावरून ) 66 'अकरा अंगे व चौदा पूर्व शास्त्र महासमुद्र आहे. त्याचे वर्णन करणारे आज कोणी केवली नाहीत, श्रुतकेवलीही नाहीत. आमच्यासारखे क्षुद्र काय वर्णन करणार ? आत्म्याचं कल्याण करणारी जिनवाणी सरस्वती श्रुतदेवी आहे. ती अनंत समुद्राइतकी आहे. ही जिनवाणी जो कोणी धारण करील त्या जीवाचं कल्याण होईल. त्यापैकी एक अक्षर, 'ॐ' हे एकच अक्षर जो धारण करतो त्या जीवाचं सुद्धा कल्याण होतं. सम्मेदशिखरजीवर भांडण करणारे दोन वानर या मंत्राच्या स्मरणानं स्वर्गाला गेले. याच्या स्मरणानं गोपाल सुदर्शन शेठ होऊन मोक्षाला गेला. सप्त व्यसनधारी अंजनचोर देखील मोक्षाला गेला. असे अनेकजण मोक्षाला गेलेत. हे तर सोडा ! नीच जातीचा कुत्रा जीवंधरकुमाराच्या उपदेशानं सद्गतीला गेला. इतका महिमा जिनधर्माचा आहे. परंतु तो धर्म खऱ्या अर्थानं कोण धारण करतो ? जैन होऊन सुद्धा जिनधर्मावर विश्वास नाही. अनंत कालापासून जीव व पुद्गल हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत असं सर्व जग म्हणतं, परंतु विश्वास नाही. पुद्गलाला जीव व जीवाला पुद्गल मानीत आलं आहे. दोन्हीचे गुणधर्म अलग आहेत. हे दोन्ही अलग अलग आहेत. जीव पुद्गल आहे का ? का पुद्गल जीव आहे ? पुद्गल तर जड आहे. स्पर्श, रस, गंध, वर्ण त्याचे गुण आहेत. ज्ञान दर्शनरूप चेतना हे लक्षण जीवाचे आहे. आपण तर जीव आहोत. जीवाचं कल्याण करणं, त्याला अनंत सुखाला पोहोचविणं आपलं काम आहे. परंतु मोहनीय कर्मानं जग सगळं भुलून गेलं आहे. दर्शन - मोहनीय कर्म सम्यक्त्वाचा घात करते. चारित्र मोहनीय कर्म चारित्राचा घात करते. तर आपण काय केलं पाहिजे ? सुख प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे ? दर्शन मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता सम्यक्त्व धारण केलं पाहिजे व चारित्र मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता संयम धारण करावा. हाच आमचा आदेश आहे व हाच उपदेश आहे. " " अनंत कालापासून जीव मिथ्यात्व कर्माच्या योगानं संसारामध्ये फिरत आहे, म्हणून मिथ्यात्व कर्माचा नाश केला पाहिजे. सम्यक्त्व धारण केलं पाहिजे. सम्यक्त्व काय आहे ? याचं समग्र वर्णन कुंदकुंदाचार्यांनी समयसार, नियमसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, अष्टपाहुड आदि ग्रंथांमध्ये केलं आहे. पण याच्यावर श्रद्धा ठेवतो कोण ? आपलं आत्मकल्याण करून घेणारा जीवच श्रद्धा ठेवून सुख कशानं होईल याचा अनुभव घेतो. असंच संसारामध्ये फिरावयाचं असेल तर, अनादि कालापासून फिरत आलाच आहे. उपाय नाही. तर आपण काय केले पाहिजे ? " दर्शन - मोहनीय कर्माचा क्षय केला पाहिजे. दर्शन - मोहनीय कर्माचा क्षय आत्मचिंतनाने होतो. कर्माची निर्जरा आत्म-चिंतनाने होते. दान पूजा केली तर पुण्यबंध होतो. तीर्थयात्रा केली तर पुण्यबंध होतो. हरएक धर्मकार्य ( शुभप्रवृत्ति ) पुण्यबंधाला कारण आहे. परंतु केवलज्ञान होण्याला, अनंत Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 ... 566