________________
७४
प्रथमः पादः
वीसा । बहुलाधिकारात् क्वचिन्न भवति । सिंहदत्तोः । सिंहराओ । (अनु.) जिह्वा इत्यादि शब्दांत, ति या शब्दासह इकाराचा ई होतो. उदा. जीहा... ...वीसा. बहुलचा अधिकार असल्याने, क्वचित् (इकाराचा ई होत नाही. उदा. ) सिंह... राओ.
( सूत्र ) र्लुकि निर: ।। ९३।।
(वृत्ति) निर्उपसर्गस्य रेफलोपे सति इत ईकारो भवति । नीसरइ । नीसासो । र्लुकीति किम्। निण्णओ। निस्सहाइँ' अंगाई ।
(अनु.) निर् या उपसर्गातील रेफाचा (= र् चा) लोप झाला असताना, इ चा ईकार होतो. उदा. नीसरइ, नीसासो. ( निर् मधील ) र् चा लोप झाला असता, असे का म्हटले आहे ? ( कारण जर या र् चा लोप झाला नसेल, तर इ चा ई होत नाही. उदा.) निण्णओ... अंगाई.
( सूत्र ) द्विन्योरुत् ।। ९४ ।।
(वृत्ति) द्विशब्दे नावुपसर्गे च इत उद् भवति । द्वि । दुमत्तो५ । दुआई । दुविहो । दुरेहो । दुवयणं । बहुलाधिकारात् क्वचिद् विकल्पः । दुउणो ६ बिउणो । दुइओ बिइओ । कचिन्न भवति । द्विजः । दिओ । द्विरदः । दिरओ। क्वचिद् ओत्वमपि । दोवयणं । नि । णुमज्जइ । णुमन्नो। क्वचिन्न भवति। निवडइ'।
(अनु.) द्वि या शब्दात आणि नि या उपसर्गात, इ चा उ होतो. उदा. द्वि (मधील इ चा उ ) :- दुमत्तो...दुवयणं. बहुलचा अधिकार असल्याने, क्वचित् (द्विमधील इ चा उ) विकल्पाने होतो. उदा. दुउणो... बिइओ. (क्वचित् द्विमधील इ चा उ) होत नाही. उदा. द्विज... दिरओ. क्वचित् (द्विमधील इ चा ) ओ सुद्धा होतो. उदा. दोवयणं. (आता) नि (मधील इ चा उ ) :- णुमज्जइ, णुमन्नो. क्वचित् (नि मधील इ चा उ) होत नाही. उदा. निवडइ.
१ सिंहदतः २ सिंहराजः ३ निर्णयः ४ नि:सहानि अङ्गानि।
५ क्रमाने :- द्विमात्र, द्विजाति, द्विविध, द्विरेफ, द्विवचन. ६ क्रमाने :- द्विगुण, द्वितीय ७ क्रमाने :- निमज्जति, निमग्न. ८ प