________________
प्राकृत व्याकरणे
१२७
उदा. खाणू. (स्थाणु शब्दाचा) शंकर हा अर्थ नसताना असे का म्हटले आहे ? (कारण स्थाणु शब्दाचा शंकर हा अर्थ असेल तर स्थ चा ख होत नाही. उदा.) थाणुणो रेहा।
(सूत्र) स्तम्भे स्तो वा ।। ८।। (वृत्ति) स्तम्भशब्दे स्तस्य खो वा भवति। खम्भो थम्भो। काष्ठादिमयः। (अनु.) स्तम्भ या शब्दात स्त चा ख विकल्पाने होतो. उदा. खम्भो, थम्भो. (हा
खांब) काष्ठ इत्यादींचा आहे.
(सूत्र) थ-ठावस्पन्दे ।। ९॥ (वृत्ति) स्पन्दाभाववृत्तौ स्तम्भे स्तस्य थठौ भवतः। थम्भो ठम्भो। स्तम्भ्यते
थम्भिज्जइ ठम्भिज्जइ। (अनु.) स्पंदाचा (= स्पंदनाचा, हालचालीचा) अभाव या अर्थी असणाऱ्या स्तम्भ
या शब्दात स्त चे थ आणि ठ होतात. उदा. थंभो...ठंभिज्जइ.
(सूत्र) रक्ते गो वा ॥ १०॥ (वृत्ति) रक्तशब्दे संयुक्तस्य गो वा भवति। रग्गो रत्तो। (अनु.) रक्त या शब्दात संयुक्त व्यंजनाचा विकल्पाने ग होतो. उदा. रग्गो, रत्तो.
(सूत्र) शुल्के गो वा ।। ११॥ (वृत्ति) शुल्कशब्दे संयुक्तस्य गो वा भवति। सुङ्गं सुक्कं। (अनु.) शुल्क या शब्दात संयुक्त व्यंजनाचा ङ्ग विकल्पाने होतो. उदा. सुगं,
सुक्कं.
(सूत्र) कृत्ति-चत्वरे चः ।। १२।। (वृत्ति) अनयोः संयुक्तस्य चो भवति। किच्ची। चच्चरं। (अनु.) कृति आणि चत्वर या शब्दांत संयुक्त व्यंजनाचा च होतो. उदा. किच्ची,
चच्चरं.
A-Proof