Book Title: Prakrit Vyakaran
Author(s): Hemchandracharya, 
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 567
________________ ५६६ टीपा श्लोक १ :- (टीकाकाराच्या मते, विद्यासिद्धीसाठी कोणा एका सिद्ध पुरुषाने नायिकेला धन इत्यादी देऊन, तिचा भर्ता मागितला, तेव्हा ती हे शब्द उच्चारते :-) हे घेऊन जर मला प्रियकराचा त्याग करावयाचा (करावा लागणार) असेल, तर मला मरणे हेच कर्तव्य आहे, दुसरे काही नाही. येथे करिएव्वउँ, मरिएव्वउँ मध्ये इएव्वउं आदेश आहे. धुं -- सू.४.३६०. श्लोक २ :- जगात अतिरक्त अशा मंजिष्ठा वनस्पतीला (कोणत्यातरी) प्रदेशातून (जमिनीतून) उच्चाटन (उखडणे), अग्नीत कढणे आणि घणाकडून कुटून घेणे, हे सहन करावे लागते. येथे सहेव्वउँ मध्ये एव्वउं आदेश आहे. श्लोक ३ :- जरी तो वेद प्रमाण आहे तरी रजस्वला स्त्रीचे सह झोपण्यास मनाई आहे, पण जागे रहाण्यास कोण अटकाव करणार ? येथे सोएवा, जग्गेवा यांमध्ये एवा आदेश आहे. ४३९ क्त्वाप्रत्ययस्य -- सू.१.२७ वरील टीप पहा. श्लोक १ :- हे हृदया! जरी मेघ (आपले) शत्रु आहेत, तरी आपण आकाशात चढावे काय ? आपले दोन हात आहेत; जर मरायचेच असेल, तर (त्यांना) मारूनच (आपण) मरू. येथे मारि मध्ये ‘क्त्वा'ला इ आदेश आहे. अम्हहं -- सू.४.३८०. हत्थडा -- सू.४.४२९ नुसार स्वार्थे प्रत्यय आला आहे. गय....जन्ति -- येथे भजिउ मध्ये ‘क्त्वा'ला इउ आदेश आहे. श्लोक २ :- (या श्लोकात, मुंज या शब्दाने मुंज नावाचा माळव्याचा राजा, अथवा मुंज नावाचा चालुक्य राजांचा एक मंत्री अभिप्रेत आहे, असे काहींचे म्हणणे आहे). ज्यात मुंजाचे प्रतिबिंब पडले आहे असे पाणी,

Loading...

Page Navigation
1 ... 565 566 567 568 569 570 571 572 573 574 575 576 577 578 579 580 581 582 583 584 585 586 587 588 589 590 591 592 593 594