________________
४६६
टीपा
२.१२९ गौणस्य -- सू.१.१३४ वरील टीप पहा.
२.१३० इत्थी -- इ चा आदिवर्णागम होऊन हा शब्द बनला आहे.
२.१३१ दिही -- सू.१.२०९ वरील टीप पहा.
२.१३२ मञ्जर -- (म) मांजर. मार्जार-मज्जर-मञ्जर. मञ्जर मधील म चा
व होऊन वजर.
२.१३६ तट्ठ -- त्रस्तमध्ये स्त चा ठ्ठ होऊन.
२.१३८ अवहोआसं -- उभयपार्श्व किंवा उभयावकाश असाही संस्कृत प्रतिशब्द
होईल. सिप्पी -- (म) सिंप, शिंप.
२.१४२ माउसिआ -- (म) मावशी.
२.१४४ घरो -- (म) घर.
२.१४५-१६३ या सूत्रांत काही प्रत्ययांचे आदेश सांगितलेले आहेत.
२.१४५ शीलधर्म.....भवति -- अमुक करण्याचे शील (स्वभाव), अमुक
करण्याचा धर्म आणि अमक्यासाठी साधु (चांगले) या अर्थी सांगितलेल्या प्रत्ययाला इर असा आदेश होतो. केचित्.....न सिध्यन्ति -- धातूपासून कर्तृवाचक शब्द साधण्याचा तृन् प्रत्यय आहे. त्या तृन् प्रत्ययालाच फक्त इर असा आदेश होतो, असे काही प्राकृत वैयाकरण म्हणतात. पण त्यांचे मत मान्य केल्यास, शील इ. दाखविणारे नमिर (नमनशील), गमिर (गमनशील) इ. शब्द सिद्ध होणार नाहीत.