________________
५२८
टीपा
श्लोक ३ :- आता कलियुगात धर्म हा (खरोखर) कमी प्रभावी झाला आहे.
येथे कलिहि या स.ए.व. मध्ये 'हि' आदेश आहे. जि -- सू.४.४२०.
४.३४२
टावचनस्य....भवत: -- सू.४.३३३ नुसार टा प्रत्ययापूर्वी शब्दाच्या अन्त्य अकाराचा ए होतो. उदा. दयिअ - दइए. प्रस्तुत टा प्रत्ययाला 'ण' किंवा अनुस्वार आदेश होतो. त्यामुळे दइएं पवसन्तेण इत्यादी रूपे होतात.
४.३४३
__ श्लोक १ :- जग अग्नीमुळे उष्ण व वायुमुळे शीतल होते. पण जो
अग्नीनेही शीतल होतो, त्याला उष्णतेचे काय ? (अर्थात तो गरम होत नाही.)
येथे अग्गिएँ या तृ.ए.व. मध्ये एं आहे आणि अग्गिं मध्ये अनुस्वार आहे. तेवँ, केवँ -- सू.४.४०१,३९७. उण्हत्तणु -- सू.२.१५४ प्रमाणे त्तण प्रत्यय लागून भाववाचक नाम बनले आहे.
श्लोक २:- जरी प्रियकर अप्रिय करणारा आहे, तरी त्याला आज आण. जरी अग्नीने घर जाळले जाते, तरी त्या अग्नीशी (आपले) काम असतेच.
येथे अग्गिण मध्ये ‘ण' आणि अग्गिं मध्ये अनुस्वार आहे. तें -- त (तद्) सर्वनामाचे तृ.ए.व.
४.३४४ ___ एइ....थलि -- येथे एह थलि मध्ये सि चा, वग्ग मध्ये अम् चा,
एइ घोडा मध्ये जस् चा लोप झाला आहे. श्लोक १ :- जसजशी श्यामा स्त्री डोळ्यांचे वाकडेपण (वक्र कटाक्ष टाकण्यास) शिकते, तसतसा मदन कठिण दगडावर आपल्या बाणांना धार लावतो.