________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५३५
इकारान्त, ईकारान्त, उकारान्त आणि ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्द मुद्धा प्रमाणे
चालतात.
३५५-३६७ या सूत्रांत, अस्मद् व युष्मद् सोडून, इतर सर्वनामांची जी विशिष्ट रूपे
अपभ्रंशात होतात ती सांगितली आहेत. त्याखेरीजची त्यांची इतर रूपे त्या
त्या स्वरान्त नामाप्रमाणे होतात. ३५५ सर्वादेः अकारान्तात् -- सू.३.५८ वरील टीप पहा. जहां, तहां, कहां
-- या पं.ए.व. मध्ये 'हां' आदेश आहे. होन्तउ -- हो धातूच्या होन्त या व.का.धा.वि. पुढे (सू.३.१८१) स्वार्थे अ (सू.४.४२९) आला आहे. होन्तउ ची भवान् अशीही संस्कृत छाया दिली जाते.
३५६ श्लोक १ :- जर तिचा मजवरील अत्यंत दृढ (तिलतार) स्नेह संपला असेल, तर शेकडो वेळा वक्र दृष्टींनी मी का बरे पाहिला जातो ?
येथे किहे या पं.ए.व. मध्ये ‘इहे' आदेश आहे. तहे -- सू.४.३५९. तुट्टउ -- सू.४.४२९. नेहडा -- सू.४.४२९. मइँ -- सू.४.३७७ . सहँ -- सू.४.४१९. जोइज्जउँ -- जोअ च्या कर्मणि अंगापासूनचे रूप आहे (सू.४.३८५).
३५७ श्लोक १ :- जेथे बाणाने बाण व खङ्गाने खड्ग छिन्न केले जाते, त्या तशा
प्रकारच्या योद्ध्यांच्या समुदायात (माझा) प्रियकर (योद्ध्यांसाठी) मार्ग प्रकाशित करतो.
येथे जहिँ, तहिँ या स.ए.व. मध्ये 'हिं' आदेश आहे. सरिण, खग्गिण -- तृ.ए.व. ची रूपे. तेहइ -- तेह (सू.४.४०२) पुढे स्वार्थे 'अ' (सू.४.४२९) येऊन झालेले स.ए.व. (सू.४.३३४).
श्लोक २ :- त्या सुंदरी (मुग्धा) च्या एका डोळ्यात श्रावण (महिना), दुसऱ्या डोळ्यात भाद्रपद (महिना) आहे; जमिनीवरील बिछान्यावर माधव अथवा माघ (महिना) आहे; गालावर शरद् (ऋतु), अंगावर ग्रीष्म (ऋतु)