Book Title: Prakrit Vyakaran
Author(s): Hemchandracharya, 
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 555
________________ ५५४ इत्यादी. येथे पुढे दिलेल्या उदाहरणातील, तुच्छउँ, किज्जउँ मध्ये 'उ' चे, तरुहुँ मध्ये 'हुँ' चे, जहि मध्ये 'हिं' चे आणि तणहँ मध्ये 'हं' चे उच्चार लाघव आहे. टीपा ४१२ मकाराक्रान्तो भकार: म्हणजे म्भ. श्लोक १ :- हे ब्राह्मणा ! सर्व अंगांनी ( = बाबतीत) हुषार असे जे कोणी नर असतात, ते विरळ असतात. जे वाकडे आहेत, ते फसविणारे असतात; जे सरळ असतात, ते बैलोबा ( = ठोंबे) असतात. येथे बम्भ मध्ये 'म्ह' चा 'म्भ' झाला आहे. छइल्ल (हिं) छैला. उज्जुअ ऋजु मधील ऋ चा उ ( सू. १.१३१) आणि 'ज' चे द्वित्व (सू.२.९८) होऊन झालेल्या उज्जू पुढे स्वार्थे 'अ' आला. बइल्ल (म) बैल. —— —— ४१४ श्लोक १ :- ते दीर्घ लोचन निराळेच आहेत; भुजयुगल निराळेच आहे; तो घन स्तनांचा भार निराळाच आहे; ते मुखकमल निराळेच आहे; केशकलाप निराळाच आहे; आणि गुण व लावण्य यांचा निधी अशी ती सुंदरी (नितम्बिनी) ज्याने घडविली, तो विधि (ब्रह्मदेव) ही प्राय: निराळाच आहे. येथे प्रायस् शब्दाला प्राउ असा आदेश झाला आहे. श्लोक २ : - प्राय: मुनींना सुद्धा भ्रांती आहे; ते (फक्त) मणी मोजतात, (पण) अद्यापि अक्षर व निरामय अशा परम पदी ते लीन झालेले नाहीत. येथे प्रायस् शब्दाला प्राइव आदेश आहे. भन्तडी भन्ति पुढे सू.४.४२९ नुसार अड हा स्वार्थे प्रत्यय आला व पुढे सू३.४.४३१ नुसार स्त्रीलिंगी ई प्रत्यय लागला. मणिअडा सू.४.४३० नुसार मणि शब्दापुढे स्वार्थे प्रत्यय आले. श्लोक ३ :- सखि! ( मला वाटते) सुंदरीची नयनरूपी सरोवरे प्रायः अश्रुजलाने ओसंडत आहेत; म्हणून ते (नयन) जेव्हा समोरासमोर (कुणाकडे

Loading...

Page Navigation
1 ... 553 554 555 556 557 558 559 560 561 562 563 564 565 566 567 568 569 570 571 572 573 574 575 576 577 578 579 580 581 582 583 584 585 586 587 588 589 590 591 592 593 594