Book Title: Prakrit Vyakaran
Author(s): Hemchandracharya, 
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 537
________________ ५३६ आहे; सुखासिका (सुखाने बसणे) रूपी तिळाच्या वनात मार्गशीर्ष (महिना) आहे; आणि मुखकमलावर शिशिर (ऋतु) राहिला आहे. या श्लोकात एका विरहिणीच्या स्थितीचे वर्णन आहे. त्याचा भावार्थ असा :- श्रावण-भाद्रपद महिन्यातील पावसाच्या सरीप्रमाणे तिच्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळत होत्या. वसंत ऋतूतल्याप्रमाणे तिचा बिछाना पल्लवांचा होता. शरद ऋतूतील मेघांप्रमाणे (किंवा काशकुसुमाप्रमाणे ) तिचे गाल पांढरे पडले होते. ग्रीष्मातल्याप्रमाणे तिचे अंग तप्त होते. शिशिर ऋतूतील कमळाप्रमाणे तिचे मुखकमल कोमेजले होते. या श्लोकात एक्कहिं, अन्नहिं या स.ए.व मध्ये हिं आदेश आहे. माहउ माधव (=वसंतऋतु, वैशाख ( गीलको, पृ. ३७८); किंवा माघ-क. अंगहिं सू.४.३४७. तहे सू.४.३५९. मुद्धहे • सू.४.३५०. —— —— —— —— श्लोक ३ :हे हृदया!, फदिशी फूट ; विलंब करून काय उपयोग ? तुझ्या विना शेकडो दु:खे दुष्ट दैव कोठे ठेवते, ते मी पाहीन. येथे कहिँ या स.ए.व. मध्ये 'हिं' आदेश आहे. हिअडा सू. ४.४२९. फुट्टि सू.४.३८७. फुट्ट हा भ्रंश् चा आदेश आहे (सू.४.१७७); किंवा स्फुट् धातूत ट् चे द्वित्व आणि अन्ती अ येऊन हा धातू बनला आहे. करि सू.४.४३९. देक्खउँ सू.४.३८५. पइँ सू.४.३७०. विणु सू.४.४२६. —— टीपा —— —— ३५८ श्लोक १ :- हला (अग) सखी (माझा ) प्रियकर ज्याच्यावर निश्चित रागावतो, त्याचे स्थान तो अस्त्रांनी, शस्त्रांनी वा हातांनी फोडतो. येथे जासु, तासु या ष. ए. व. मध्ये आसु आदेश आहे. महारउ महार (सू.४.४३४) पुढे अ हा स्वार्थे प्रत्यय (सू. ४.४२९) आला. निच्छइँ निच्छएं (सू.४.३४२). श्लोक २ :जीवित कुणाला प्रिय नाही ? धनाची इच्छा कुणाला नाही ? तथापि वेळप्रसंगी विशिष्ट (श्रेष्ठ) व्यक्ती (या) दोहोंनाही तृणासमान मानतात.

Loading...

Page Navigation
1 ... 535 536 537 538 539 540 541 542 543 544 545 546 547 548 549 550 551 552 553 554 555 556 557 558 559 560 561 562 563 564 565 566 567 568 569 570 571 572 573 574 575 576 577 578 579 580 581 582 583 584 585 586 587 588 589 590 591 592 593 594