________________
५३६
आहे; सुखासिका (सुखाने बसणे) रूपी तिळाच्या वनात मार्गशीर्ष (महिना) आहे; आणि मुखकमलावर शिशिर (ऋतु) राहिला आहे.
या श्लोकात एका विरहिणीच्या स्थितीचे वर्णन आहे. त्याचा भावार्थ असा :- श्रावण-भाद्रपद महिन्यातील पावसाच्या सरीप्रमाणे तिच्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळत होत्या. वसंत ऋतूतल्याप्रमाणे तिचा बिछाना पल्लवांचा होता. शरद ऋतूतील मेघांप्रमाणे (किंवा काशकुसुमाप्रमाणे ) तिचे गाल पांढरे पडले होते. ग्रीष्मातल्याप्रमाणे तिचे अंग तप्त होते. शिशिर ऋतूतील कमळाप्रमाणे तिचे मुखकमल कोमेजले होते.
या श्लोकात एक्कहिं, अन्नहिं या स.ए.व मध्ये हिं आदेश आहे. माहउ माधव (=वसंतऋतु, वैशाख ( गीलको, पृ. ३७८); किंवा माघ-क. अंगहिं सू.४.३४७. तहे सू.४.३५९. मुद्धहे • सू.४.३५०.
——
——
——
——
श्लोक ३ :हे हृदया!, फदिशी फूट ; विलंब करून काय उपयोग ? तुझ्या विना शेकडो दु:खे दुष्ट दैव कोठे ठेवते, ते मी पाहीन.
येथे कहिँ या स.ए.व. मध्ये 'हिं' आदेश आहे. हिअडा सू. ४.४२९. फुट्टि सू.४.३८७. फुट्ट हा भ्रंश् चा आदेश आहे (सू.४.१७७); किंवा स्फुट् धातूत ट् चे द्वित्व आणि अन्ती अ येऊन हा धातू बनला आहे. करि
सू.४.४३९. देक्खउँ सू.४.३८५. पइँ
सू.४.३७०. विणु
सू.४.४२६.
——
टीपा
——
——
३५८ श्लोक १ :- हला (अग) सखी (माझा ) प्रियकर ज्याच्यावर निश्चित रागावतो, त्याचे स्थान तो अस्त्रांनी, शस्त्रांनी वा हातांनी फोडतो.
येथे जासु, तासु या ष. ए. व. मध्ये आसु आदेश आहे. महारउ महार (सू.४.४३४) पुढे अ हा स्वार्थे प्रत्यय (सू. ४.४२९) आला. निच्छइँ निच्छएं (सू.४.३४२).
श्लोक २ :जीवित कुणाला प्रिय नाही ? धनाची इच्छा कुणाला नाही ? तथापि वेळप्रसंगी विशिष्ट (श्रेष्ठ) व्यक्ती (या) दोहोंनाही तृणासमान मानतात.