________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५३७
येथे कासु या ष.ए.व. मध्ये आसु आदेश आहे. वल्लहउँ -- सू.४.४२९, ४.३५४.
३५९ जहे, तहे, कहे -- या ष.ए.व. मध्ये ‘अहे' आदेश आहे. केरउ --
सम्बन्धि या शब्दाला केर आदेश होतो (सू.४.४२२); त्याच्यापुढे स्वार्थे
'अ' (सू.४.४२९) येऊन हे रूप होते. ३६० श्लोक १ :- ज्या अर्थी (माझा) नाथ अंगणात उभा आहे, त्याअर्थी तो रणक्षेत्रावर फिरत नाही.
येथे धुं, जे ही यद्, तद् यांची प्र.,द्वि. यांची ए.व.ची वैकल्पिक रूपे आहेत. चिट्ठदि, करदि -- सू.४.२७३. बोल्लिअइ -- बोल्लच्या कर्मणि अंगापासूनचे रूप. बोल्ल हा कथ् धातूचा आदेश (सू.४.२) आहे.
३६१ तुह -- सू.३.९९.
३६२ श्लोक १ :- ही कुमारी! हा (मी) पुरुष, हे मनोरथांचे स्थान; (जेव्हा)
मूर्ख (फक्त) असाच विचार करीत रहातात (तेव्हा नंतर) लगेच प्रभात होते.
__ येथे एह हे स्त्रीलिंगी एहो हे पुल्लिंगी व एहु हे नपुं. एतद् सर्वनामाचे प्र.ए.व. आहे. एहउँ -- एह पुढे स्वार्थे अ (सू.४.४२९) आला आहे. वढ -- सू.४.४२२ वरील वृत्ती पहा. पच्छइ -- सू.४.४२०.
३६३ एइ ....थलि -- एइ हे एतद् चे प्र.अ.व. आहे. एइ पेच्छ -- एइ हे
एतद् चे द्वि.अ.व. आहे.
३६४ श्लोक १ :- जर मोठी घरे विचारीत असाल, तर ती (पहा) मोठी घरे.
(पण) दु:खी जनांचा उद्धार करणारा (माझा) प्रियकर झोपडीत आहे, (तो) पहा.
येथे ओइ हे अदस् चे प्र. आणि द्वि.अ.व. आहे.