________________
टीपा
३६५ इदम्...भवति -- विभक्ती प्रत्ययापूर्वी इदम् सर्वनामाचे आय असे अंग
होते.
श्लोक १ :- लोकांच्या ह्या डोळ्यांना (पूर्व) जन्माचे स्मरण होते, यात शंका नाही; (कारण) अप्रिय (वस्तू) पाहून, ते संकुचित होतात व प्रिय (वस्तू) पाहून ते विकसित होतात.
येथे आयइँ या प्र.अ.व. मध्ये आय असा आदेश आहे. या श्लोकात जाई-सरइँ असा एक शब्द घेऊन, जाति-स्मराणि अशी संस्कृत छाया घेणे अधिक योग्य वाटते. मउलिअहिं -- सू.४.३८२
श्लोक २ :- समुद्र सुको वा न सुको; वडवानलाला त्याचे काय ? अग्नि पाण्यात जळत रहातो, हेच (त्याचा पराक्रम दाखविण्यास) पुरेसे नाही का?
येथे आएण या तृ.ए.व. मध्ये आय आदेश आहे. च्चिअ -- सू.२.१८४.
श्लोक ३ :- या तुच्छ शरीरापासून जे प्राप्त होते ते चांगले; जर ते झाकले तर ते कुजते; (व) जर जाळले तर त्याची राख होते.
येथे आयहो या ष.ए.व. मध्ये आय आदेश आहे.
३६६ श्लोक १ :- मोठेपणासाठी सर्व लोक तडफडतात. पण मोठेपण मुक्त हस्ताने (दान करून) प्राप्त होते.
येथे साहु या प्र.ए.व. मध्ये साह आदेश आहे. तडप्फडइ -- (म) तडफडणे. तणेण -- सू.४.४२२.
३६७ श्लोक १ :- हे दूती! जर तो (प्रियकर) घरी येत नसेल, तर तुझे अधोमुख
का ? सखी, जो तुझे वचन मोडतो (मानत नाही), तो मला प्रिय (असणार)
नाही.
येथे किम् च्या स्थानी काइँ असा आदेश आहे. तुज्झु -- अपभ्रशांत युष्मद् चे ष.ए.व. हेमचंद्र तुज्झ (सू.४.३७२) असे देतो. तुज्झु साठी