________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
सू.४.३७२ वरील टीप पहा. तउ
काइँ.. .देख
——
——
——
सू. ४.३७२. मज्झ सू.४.३७९.
येथे किम् चा काइँ आदेश आहे.
——
श्लोक २ :- ४.३५०.२ श्लोक पहा. तेथे किम् चे स्थानी कवण असा
आदेश आहे.
५३९
श्लोक ३ :सत्पुरुष कोणत्या कारणास्तव कंगु (रोपटा) चे अनुकरण करतात, ते सांग. जसजसे ( त्यांना महत्त्व प्राप्त होते, तसतसे ते मस्तक खाली नमवितात (म्हणजे नम्र होतात).
येथे कवणेण मध्ये किम् ला कवण आदेश आहे. अणुहरहिं, लहहिं, सू.४.३८२.
नवहिं
——
श्लोक ४ :(हा श्लोक एक विरही प्रियकर उच्चारतो ) जर तिचे (माझ्यावर ) प्रेम असेल, तर ती मेली असणार; जर ती जिवंत असेल, तर तिचे ( मजवर) प्रेम नाही; (एवं च) दोन्ही प्रकारांनी प्रिया (मला, माझ्या बाबतीत) नष्ट झाली; (तेव्हा) हे दुष्ट मेघ, तू (वृथा) गर्जना का करतोस? येथे किम् चाच वापर आहे. गज्जहि
सू.४.३८३.
३६८ श्लोक १ :- भ्रमरा ! अरण्यात रुणझुण ध्वनी करू नको; त्या दिशेला पहा, रडू नको. जिच्या वियोगामुळे तू मरत आहेस, ती मालती अन्य देशी आहे. येथे तुहुँ हे युष्मद् चे प्र.ए.व. आहे. रुणझुणि (म) रुणझुण . रण्णडइ अरण्य शब्दातील आद्य अ चा लोप (सू.१.६६) होऊन रण्ण पुढे सू.४.४३० नुसार स्वार्थे प्रत्यय येऊन रण्णडअ; त्याचे सू.४.३३४ नुसार स.ए.व. जोइ, रोइ सू.४.३८७. मरहि सू.४.३८३.
——
३७० श्लोक १ :- हे सुंदर वृक्षा ! तुझ्यापासून सुटे झाले तरी पानांचे पानपण (पर्णत्य) नष्ट होत नाही; परंतु तुझी कसलीही जरी छाया असली तरी ती त्या पानांमुळेच ( आहे).