________________
५४०
टीपा
येथे युष्मद् च्या तृ.ए.व. मध्ये पइं आदेश आहे. पत्तत्तणं -- सू.२.१५४. होज -- सू.३.१७९.
श्लोक २ :- (अन्य स्त्रीवर आसक्त झालेल्या नायकाला उद्देशून नायिका हा श्लोक उच्चारते :-) माझे हृदय तू (जिंकले आहेस); तिने तुला (जिंकले आहे); आणि ती (स्त्री) सुद्धा दुसऱ्याकडून पीडली जात आहे. प्रियकरा! मी काय करू ? तू काय करणार ? माश्याकडून मासा गिळला जात आहे.
येथे युष्मद् च्या तृ.ए.व. मध्ये तइं आदेश आहे. महु -- सू.४.३७९. करउँ -- सू.४.३८५.
श्लोक ३ :- तू व मी दोघेही रणांगणावर गेल्यावर, (दुसरा) कोण (बरे) विजयश्रीची इच्छा करील ? यमाच्या पत्नीचे केस धरल्यावर, कोण सुखाने राहील ? ते सांग.
येथे युष्मद् च्या स.ए.व. मध्ये पइँ आदेश आहे. मइँ-- सू.४.३७७. बेहि, रणगयहिं, केसहिं -- सू.४.३४७. लेप्पिणु -- सू.४.४४०. थक्केइ -- थक्क. हा स्था धातूचा आदेश आहे (सू.४.१६). एवं तई - - उदा. तई कल्लाण (कुमारपालचरित - ८.३४).
श्लोक ४ :- (सारस पक्ष्याप्रमाणे) तुला जर मी टाकले, तर मी मरेन; मला तू टाकलेस, तर तू मरशील; (कारण सारस पक्ष्यांपैकी) जो सारस ज्यापासून वेगळा असेल, तो कृतान्ताचे साध्य (मृत्यूला वश) होतो.
येथे युष्मद् च्या द्वि.ए.व. मध्ये पइं आदेश आहे. वेग्गला -- (म) वेगळा. एवं तई -- उदा. तइँ नेउं अक्खउ ठाणु (कुमारपालचरित - ८.३२).
३७१ श्लोक १:- तुम्ही आम्ही (रणांगणात) जे केले, ते पुष्कळ लोकांनी पाहिले; त्यावेळी इतके मोठे युद्ध (आपण) एका क्षणात जिंकले.
येथे युष्मद् च्या तृ.अ.व. मध्ये तुम्हेहिं आदेश आहे. अम्हेहिं --