________________
२१२
तृतीयः पादः
(अनु.) (सि इत्यादि) विभक्ति-प्रत्यय पुढे असताना (शब्दाच्या अन्त्य) ऋचा
आर असा आदेश होतो. उदा. भत्तारो...भत्तारेहिं. अशाप्रकारे ङसि इत्यादि प्रत्यय पुढे असताना उदाहरणे (घ्यावीत). (अन्त्य ऋचा आर झाल्यानंतर काही कारणाने) स्यादि (विभक्ति) प्रत्ययांच्या लोपाची अपेक्षा असली तरी (आर तसाच रहातो. उदा.) भत्तारविहिअं.
(सूत्र) आ अरा मातुः ।। ४६।। (वृत्ति) मातृसंबंधिन ऋतः स्यादौ परे आ अरा इत्यादेशौ भवतः। माआ
माअरा। माआउ माआओ माअराउ माअराओ। माअं माअरं इत्यादि। बाहुलकाजनन्यर्थस्य आ देवतार्थस्य तु अरा इत्यादेशः। माआए कुच्छीए। नमो माअराण। ‘मातुरिद्वा' (१.१३५) इतीत्वे माईण इति भवति। ऋतामुद(३.४४) इत्यादिना उत्वे तु माऊए समन्निअं
वन्दे इति। स्यादावित्येव। माउदेवो। माइ-गणो। (अनु.) (सि इत्यादि) विभक्तिप्रत्यय पुढे असताना मातृ या शब्दाशी संबंधित
असणाऱ्या ऋ ला आ आणि अरा असे आदेश होतात. उदा. माआ...माअरं इत्यादि. बहुलत्वामुळे आई हा अर्थ असणाऱ्या मातृ शब्दात आ आणि देवता अर्थ असताना (मातृशब्दात) अरा असा आदेश होतो. उदा.माआए... माअराण. 'मातुरिद्वा' या सूत्रानुसार, (मातृ शब्दातील ऋ चा) इ झाला असता, माईण असे (रूप) होते. पण 'ऋतामुद' इत्यादि सूत्रानुसार (मातृमधील ऋ चा) उ झाला असता 'माऊए समन्निअं वंदे' असे होते. विभक्तिप्रत्यय पुढे असतानाच (मातृमधील ऋ ला आ, आरा हे आदेश होतात; इतर वेळी नाही. उदा.) माइदेवो, माइगणो.
(सूत्र) नाम्न्यरः ।। ४७॥ (वृत्ति) ऋदन्तस्य नाम्नि संज्ञायां स्यादौ परे अर इत्यन्तादेशो भवति। पिअरा।
पिअरं पिअरे। पिअरेण पिअरेहि। जामायरं जामायरे। जामायरेण
जामायरेहिं। भायरा। भायरं भायरे। भायरेण भायरेहि। १ कुक्षि २ नमः ३ मातृदेव ४ मातृगण ५ पितृ ६ जामातृ ७ भ्रातृ