________________
४४०
टीपा
१.९२ जीहा -- सू.२.५७ नुसार जिह्वाचे वर्णान्तर जिब्भा झाले; पुढे ब् चा
लोप होऊन, जीभा; मग सू.१.१८७ नुसार भ चा ह होऊन जीहा, असेही म्हणता येईल.
१.९३ निउँ पसर्गस्य -- निर् या उपसर्गाचा. ज्या अव्ययांचा धातूशी योग
होतो त्यांना उपसर्ग म्हणतात. उपसर्ग धातूंच्या पूर्वी जोडले जातात. प्र, परा, सम्, अनु, अव, निर्, दुर्, अभि, वि, अधि, अति इ. उपसर्ग आहेत. निस्सहाइँ -- सू.३.२६ पहा.
१.९४ नावुपसर्गे -- नि या उपसर्गात. णुमज्जइ -- हे निमज्जति चे वर्णान्तर
आहे. (णुमज्ज असा नि+सद् धातूचा आदेशही आहे. सू.४.१२३ पहा).
१.९५ उच्छू -- (म) ऊस. १.९६ जहट्टिलो जहिट्ठिलो -- र च्या ल साठी सू.१.२५४ पहा.
१.९७ कृग् धातोः -- कृ या धातूचा.
१.१०० कम्हारा -- श्म च्या म्ह साठी सू.२.७४ पहा.
१.१०२ जुण्ण -- (म) जुना.
१.१०४ तीर्थ शब्दात सू.२.७२ नुसार ह येतो.
१.१०९ अवरिं उवरिं -- येथे अन्त्य रि वर अनुस्वारागम झाला आहे. १.११४ ऊसुओ....ऊसरइ -- या उदाहरणांत, संयुक्त व्यंजनातील एका
अवयवाचा लोप होऊन, मागील स्वर दीर्घ झाला, असे म्हणता येईल.
१.११५ सदृश नियम सू.१.१३ मध्ये पहा.