________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४३३
गेले आहेत. एसा अच्छी -- अच्छी हे स्त्रीलिंगी रूप आहे हे दाखविण्यास एसा हे स्त्रीलिंगी सर्वनाम वापरले आहे. चक्खूई, नयणाई, लोअणाई, वयणाई ही नपुं. रूपे आहेत. विजूए हे स्त्रीलिंगी रूप आहे. कुलं, छंद, माहप्पं, दुक्खाइं, भायणाई ही नपुं. रूपे आहेत. नेत्ता....सिद्धम् -- हेमचंद्राचे मत असे दिसते की नेत्र आणि कमल हे शब्द संस्कृतमध्येही पुल्लिंगी व नपुं. आहेत.
१.३४ क्लीबे -- नपुंसकलिंगात. गुणा, देवा, बिन्दुणो, खग्गो, मंडलग्गो,
कररुहो, रुक्खा ही पुल्लिंगी रूपे आहेत. विहवेहिँ गुणाइँ मग्गन्ति -- विभवैः गुणान् मार्गयन्ति, अशीही संस्कत छाया दिली गेली आहे.
१.३५ एसा गरिमा....एस अञ्जली -- येथे शब्दांचे स्त्रीलिंग व पल्लिंग
दाखविण्यास अनुक्रमे एसा व एस ही सर्वनामाची स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी रूपे वापरली आहेत. गड्डा गड्डो -- सू.२.३५ पहा. इमेति तन्त्रेण - - सूत्रात इमा (इमन्) असा प्रत्यय सांगून नियम दिला असल्याने. त्वादेशस्य.... संग्रहः :- संस्कृतात भाववाचक नाम साधण्याचा त्व असा प्रत्यय आहे. उदा. बाल-बालत्व. या त्व प्रत्ययाला प्राकृतात इमा (डिमा) व त्तण असे आदेश होतात (सू.२.१५४). उदा. पीणिमा, पीणत्तण. तसेच, संस्कृतात ‘पृथु' इत्यादी काही शब्दांना इमन् प्रत्यय लावून भाववाचक नामे साधली जातात. उदा. पृथु-प्रथिमन्. प्रस्तुत सूत्रात जो इमा शब्द वापरला आहे, तो ‘त्व' चा आदेश या स्वरूपात येणारा इमा (डिमा) आणि पृथु इत्यादी शब्दांना लागणारा इमा (इमन्) या दोहोंचेही ग्रहण (संग्रह) करतो.
१.३६ बाहु -- शब्द संस्कृतात पुल्लिंगी आहे.
१.३७ संस्कृतलक्षण -- संस्कृत व्याकरण. डो....भवति -- डो असा
आदेश होतो. डो म्हणजे डित् ओ. डित् म्हणजे ज्यातील ड् इत् आहे.