Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२० : आराधना कथाकोष
तदा पाचारोनि शिष्यवर्ग । म्हने कोन जानेरे जैन मार्ग । सत्य वदेत्यासि देईन स्वर्ग । न तरि उपसर्ग थोर होईल ॥५७॥ एथे कोण असे जैनमति । ते सत्य वदावि वचनोक्ति । मम पायाचि तुम्हा प्रति । असे शपति तुम्हा लागि ||५८ || गुरु वाक्य ऐकोनि ऐसे । वदते झाले सर्वहि शिष्या । स्वामि येथे कोन्हि न दिसे । तव पायाचि असे शपथ ||५९ || तत्परीक्षा कराव्या सत्वरी । जिनबिंब ठेविले सभांतरी । शिष्यवर्गास पाचारि । भाषण करि सर्वाहित ||६०|| पृथक् पृथक् सर्वे जन । हे प्रतिमा करावि उल्लंघन । जो मत्वाक्य न करि प्रमान । त्याचे मरण समीपाले ॥ ६१ ॥ गुरु वाक्य ऐकोनि ऐसे । उलंघन करिति सर्व शिष्ये । अकलंक विचारि निजमानसे । आम्हा आले असे प्राण संकट ||६२|| निजयज्ञोपवीत काढिले । तत्बिावरि टाकिले ।
बोधfor faa करोनि भले । उल्लंघोनि गेले सरवरि ॥ ६३ ॥
ऐसिया उपाय करोन । संकष्ट केले निवारण | धम्र्माचार्य म्हणे येथे जैन । निश्चय करोन असे खरा ॥ ६४ ॥ तदा कोन्हे एके दिवसि । विचारोनि स्व- मानसि । गौनि भरोनि कांस भांड्रासि तृतीय तलावासि ठेविले ॥ ६५ ॥ निशा मध्य दोन प्रहरि । शिष्य निद्रस्थ असता भारि । एक एकाचे सिरान्यांतरि । सेवक चतुरि बैसविले ॥ ६६ ॥ I तयासि केले निरूपण । या सर्वहि शिष्यामाजि जान । उठोनि वदे जो जिन जिन । त्यासि धरोन आना येथे ॥ ६७ ॥ ऐसे दोनि त्वरित । भांड गौन लौटिलि चौकात । तत् शब्द उठला ग्रामात । यथा इद्युत्पात भूमंडळी ||६८||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org