Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
guunt ada 311 312
ग्रन्थ
SI
फ्र
Ve
२०८
इतिहास और संस्कृति
जगाला प्रत्यक्ष जाणतात व पाहतात । त्याचप्रमाण श्रुतकेवलीही शास्त्रात कथन केलेला प्रत्येक विषय श्रुतज्ञानाने स्पष्टपणे जाणत ।
श्री आनन्द
भ० महावीरांच्या निर्वाणानंतर तीन केवलज्ञानी व पाच श्रुतकेवली झाले । त्यातील भद्रबाहु हे शेवटचे श्रुतकेवली होते । पुढे दुष्काल व इतर काही आपत्तीमुले साधूचारात बरीचशी शिथिलता आली । भद्रबाहूच्या गैरहजेरीत जे साहित्य लिहिले गेले ते एकपक्षी होते । त्यांना इतरांनी मान्यता दिली नाही व यामुलेच जैनधर्माचे श्वेतांबर व दिगंबर हे दोन संप्रदाय निर्माण झाले ।
प्रस्तुत लेखामध्ये श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायातील अगदी प्रमुख पाच आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ यांचा आढावा घेण्यात आला आहे । यातील बहुतेक आचार्यांना दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे । ते आचार्य पुढील प्रमाणे १. आ० उमास्वाति, २. आ० हरिभद्रसूरि, ३. भट्टाकलंक, ४. आ० नेमिचंद्र, ५. आ० हेमचंद्र |
आचार्य उमास्वाति व तत्वार्थसूत्र
आ० उमास्वाति है विक्रम सं तिसऱ्या शतकात होऊन गेले । ते कुंदकुंदाचे पट्टशिष्य असून त्यांनी जैन सिद्धांत संस्कृत साहित्यात निबद्ध करून 'तत्वार्थ सूत्र' नामक महान ग्रंथाची रचना केली । श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायांची या आचार्यांना मान्यता आहे । दिगंबर परंपरेत त्यांना 'उमास्वामी' म्हटले असून, श्वेताबर परंपरेत त्यांना 'उमास्वाती' असे म्हटले आहे । या आचार्यांनी कमीत कमी लिहून जास्तीजास्त प्रसिद्धि मिलविली आहे ।
आ० उमास्वातीचा परिचय आपणाला श्वेतांबरी तत्त्वार्थाधिगम' या ग्रंथात मिलतो | त्यांचा जन्म न्यग्रोधिका नामक नगरीत झाला असून त्यांच्या पित्याचे नाव स्वाति आणि मातेचे नाव वात्सी असे होते । गोत्राने ते कौभिषिणी होते । त्यांना गृध्रपिच्छाचार्य या नावाने देखील संबोधिले जाते ।
गावोगाव विहार करीत असताना ते एकदा कुसुमपूर नगरात आले । तेथे तुच्छ शास्त्रामुले हतबुद्धि झालेल्या लोकांच्या विषयी अनुकंपा निर्माण होऊन व त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता तत्वार्थसूत्राची रचना केली असावी, अशी एक कथा दिली जाते । तर सिद्धय नावाच्या विद्वानाला मोक्षाचे स्वरूप समजावून देण्यासाठी तत्वार्थसूत्र या ग्रंथाची रचना केली असावी, अशी दुसरी कथा सांगितली जाते अर्थात संस्कृतमध्ये सूत्ररचना करणारे हे प्रथम जैन आचार्य मानले जातात । शेकडो ग्रंथांचा सार काढून आ० उमास्वातीनी 'तत्वार्थसूत्र' या महान ग्रंथाची रचना केली । या ग्रंथाला दूसरे नाव 'मोक्षशास्त्र' असेही दिले आहे । वैदिक दर्शनात जे महत्व गीतेस, मुस्लिम धर्मात जे महत्व कुराणास, ख्रिस्ती लोकांत जे महत्व बायबल या ग्रंथास आहे, तच महत्व जैन परंपरेत 'तत्वार्थसूत्र' या ग्रंथास दिले गेले आहे ।
'तत्वार्थ सूत्र' द्रव्यानुयोगातील एक प्रमुख ग्रंथ म्हणून गणला जातो । हा ग्रन्थ एकूण दहा अध्यायात विभागला आहे । त्याचे प्रामुख्याने ज्ञानमीमांसा, ज्ञ ेयमीमांसा व चारित्रमीमांसा या तीन भागात विभाजन केले असून, या ग्रंथात जवल जवल एकूण ३५७ इतकी सूत्रसंख्या आहे । 'सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्ग' या अतिशय महत्वपूर्ण सूत्राने या ग्रंथाची सरूवात झाली आहे । ज्ञानमीमांसेच्या पहिल्या
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org