Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
وعقعقعة
مع مرمت ورد ورود به معترفع وتمتعهعهعهعععاع عقد من معه مو مریمرغيفقعوا دردی کے مرهقرعید معرفیع عرقعا
२१४
इतिहास और संस्कृति
आ० नेमिचंद्र सिद्धांतिदेव व आ० नेमिचंद्र सिद्धांत चक्रवती हे दोन्ही आचार्य भिन्न भिन्न असावेत की एकच असावेत याविषयी विद्वानांच्यात अजन मतभेद आहेत .आ० नेमिचंद्र सिद्धांतिदेव यांनी 'बहद द्रव्यसंग्रह' या ग्रंथाची रचना केल्याचे मानले जाते तर, आ० सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्रांनी 'गोम्मटसार' ग्रंथाची रचना केल्याचे मानले आहे । या दोन्ही आचार्याची माहिती आपणाला पं० जुगलकिशोर मुख्तार यांच्या पुरातन वाक्य सूची मध्ये, बृहदद्रव्यसंग्रह लेखक अजितकुमार जैन यांच्या प्रस्तावनेत, सन्मतिज्ञानप्रसारक मंडल सोलापूर संपादित द्रव्यसंग्रह, व भारतीय ज्ञानपीठ द्वारा प्रकाशित 'जैनेन्द्र सिद्धान्त कोश' इत्यादि ग्रंथातून पाहावयास मिलते । आगदी आलिकडे प्रसिद्ध झालेतया जैनेन्द्र सिद्धान्त कोश ग्रंथात हे दोन्ही ग्रंथ एकाच नेमिचंद्र आचार्याचे मानले आहेत (प्र० खंड पृ० नं०६२३) । या दोन ग्रंथकर्त्या विषयी विशेष सखोल विचार करणे येथे शक्य नाही।
आ० नेमिचद्रांनी विपुल ग्रंथरचना केली नसलीतरी, जी ग्रंथरचना केली आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे । त्यांच्या ग्रंथाच्या शैलीविरुनच त्यांची अगाध विद्वत्ता सहजपणे आपणाला दिसून येते। जैन सिद्धांतशास्त्रावर गाढ प्रभुत्व असलेते नेमिचंद्राचार्यासारखे आचार्य अगदी अल्पच दिसून येतात । सिद्धांतशास्त्रावर त्यांनी आपली रचना अगदी अधिकार वाणीने केली आहे । त्यांची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे मानण्यात आली आहे । १. गोम्मटसार २. लब्धिसार ३. क्षपणसार ४. त्रिलोकसार इ।
प्रस्तुत ठिकाणी आ० नेमिचंद्रांच्या 'गोम्मटसार' या प्रसिद्ध ग्रंथाविषयी संक्षिप्त व महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे।
गोम्मटसार' या ग्रंथनिर्मितीविषयी एक कथा सांगितली जाते। आचार्य श्री सिद्धांत चक्रवर्ती एकदा सिद्धांत ग्रंथाचा स्वाध्याय करीत असताना, चामुडराय यांनी पाहिले । व त्यांच्या दर्शनास गेले तेव्हा आचार्यश्रीनी चटकन शास्त्रवाचन बंद केले । चामुंडरायांनी कारण विचारताय ते म्हणाले, 'श्रावकांनी सिद्धांत ग्रंथ वाचू नयेत । असे शास्त्र आहे । त्यातील गूढाशयाचे नीट आकलन न झाल्यास काही विपरीत घटना घडण्याची शक्यता असते ।' पण तत्वजिज्ञासू चामुंडरायाने पुनःपुनः विनवणी केल्यावर, त्यांनी श्रावकांच्या स्वाध्यायाला योग्य होईल अशा त-हेने 'पंचसंग्रह' या ग्रंथाची रचना केली । नेमिचंद्रांनी आपल्या या तत्त्वजिज्ञासू व महान धर्मप्रभावक शिषयाच्या गौरवार्थ या ग्रंथाला 'गोम्मटसार' असे नाव दिले ।' शिवाय ग्रंथकर्ता गोम्मटदेवतेचे भक्त होते आणि गोम्मट राजा आचार्या चा भक्त होता ।
'गोम्मटसार' ग्रंथाचे जीवकांड व कर्मकांड असे दोन विभाग आहेत । सिद्धांतशास्त्रातील विस्तृत विषयांचे विवेचन या ग्रंथात संक्षिप्त रूपाने घेतले आहे । महाकर्मप्राभूत सिद्धांतातील जीवट्ठाण, खुद्दाबध, बंधस्वामी, वेदनाखंड, वर्गणाखंड, या पाच महान सिद्धांत शास्त्रातील विषयांचे संक्षिप्त संकलन या 'गोम्मटसार' ग्रंथात केले आहे । यामुलेच या ग्रंथाचे दुसरे नाव 'पचसंग्रह' असेही दिले आहे।
'गोम्मटसार' ग्रंथातील जीवकांडात संसारी जीवांच्या कर्माच्या कमी अधिक आवरणाप्रमाणे होणा-या विविध अवस्थांचे वर्णन केले आहे । गति, जाति, पर्याप्ति, कषाय, लेश्या, वेद इत्यादि चौदा मार्गणाद्वारे कर्माधीन जीवांच्या विविध उच्च नीच अवस्थांचे वर्णन या भागात केले आहे ।
'कर्मकांड' विभागात अष्ट प्रकारची कर्म, कर्माचे स्वरूप, कर्माचा स्थितिकाल, कर्माची फलदायक
GION
MPA
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org