Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
Ansaniniaww
anmaaniwwAMANANJAANABAJapadaanadaarewHIANASAAMARIAAAAAAAMANABAAAAAIAIMJABARABANASABArsatanAmABADABABA
आचार्यप्रवभिआचार्यप्रवभिला श्रीआनन्द अन्यश्राआनन्दाअन्श2
Www.niwwmom
wriNAVIN
इतिहास और संस्कृति
.
यांवर हेमचंद्रांचे ज्ञानाने परिपूर्ण असे महान ग्रंथ आहेत । त्यांनी आपल्या बहुमोल जीवनात साढ़े तीन कोटी श्लोकांची रचना केली असल्याचे मानले जाते । त्यांची विविध ग्रंथरचना पुढीलप्रमाणे आहे।
१. सिद्धहेमशब्दानुशासन । २. द्वयाश्रय महाकाव्य । ३. अभिधान चिंतामणि, अनेकार्थसंग्रह, देशीनाममाला, निघंटुशेष (कोष साहित्य), ४. काव्यानुशासन, ५. छंदोनुशासन ६. प्रमाणमीमांसा, अन्ययोगव्यवच्छेदिका, अयोगव्यवच्छेदिका (न्यायाविषयक) ७. योगशास्त्र (शास्त्रविययक), ८. वीतरागस्त्रोत्र ६. त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र (चरित्र साहित्य) इ। आ० हेमचंद्राच्या सर्व ग्रंथांची माहिती देणे शक्य में । येथे फक्त त्यांच्या 'सिद्धहेमशब्दानुशासन' या व्याकरण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देण्यात येत आहे
आ० हेमचंद्र एकदा विहार करीत असताना, अणहिल्लपुर पाटण नगरात येऊन पोहचले । तेथे चालुक्यवंशी सिद्धराज जयसिंह राजाचा त्यांना राजाश्रम मिलाला। या राजाला व्याकरणाची फार आवड होती । व या राजाच्या विनंतीनुसारच आ० हेमचंद्र यांनी 'सिद्धहेमशब्दानुशासन' या महान व्याकरण ग्रंथाची रचना केली । ती पाहून राजाला अत्यानंद झाला मा व्यावरण ग्रंथाची हत्तीवरून मिखणक काढली व पुढे त्याच राजाच्या मनात जैनधर्माविषयी श्रद्धा उत्पन्न झाले।
'सिद्धहेमशब्दानुशासन' या व्याकरण ग्रंथात एकूण ८ अध्याय असून त्यातील पहिले ७ अध्याय संस्कृत भाषेच्या व्याकरणाविषयी आहेत । शेवटचा अध्याय प्राकृत भाषेच्या व्याकरणाबाबत आहे या अध्यायात हेमचंद्रांनी महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची, चूलिका पेंशाची, अपभ्रंश या भाषांच्या व्याकरणाची माहिती दिली आहे। त्यांचे व्याकरण विस्तृत व प्रमाणभूत आहे। आठव्या अध्यायाचे त्यांनी चार पाद केले असन चौल पादात अपभ्रंश भाषेची लक्षणे सांगितली आहेत । खरोखरच 'सिद्धहेमशब्दानुशासन' हा व्याकरण ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण असून, हेमचंद्रांच्या उत्तरावर्ती व्याकरणकारांना तो अत्यंत उपयोगी पडला अनेक ग्रंथातुन प्रस्तुत ग्रंथाचा उल्लेख कलेला आपणाला दिसून येतो।
आ० हेमचंद्रांची लेखणी जैनसाहित्याच्या प्रत्येक साहित्याशी निगडति आहे। त्यांचे दूरदर्शिता व व्यवहारदक्षता इ० गुण पाहूनच विद्वानांनी त्यांना 'कलिकालसर्वज्ञ' या उपाधीने विभषित, केले आहे। तर पीटर्सन सारख्या पाश्चात्य विद्वानांनी त्यांना "Ocean of knowledge" अर्थात 'ज्ञानमहासागर' या सार्थ उपाधीने भूषविले आहे । आ । हेमचंद्रांची विषय वर्णन शैली सुस्पष्ट, प्रसादगुणांनी युक्त व हृदयस्पर्शी आहे । वाचकांना आपल्या ग्रंथरचनेतील शैलीने मंत्रमुग्ध करून टाकण्याची एक वेगलीच कला आहे। त्यांच्या प्रकांड पांडित्यामुलेच त्यांचे तत्कालीन विद्वानात अत्यंत मानाचे स्थान होते। साधारणपणे महान प्रतापी राजा विक्रमादित्याच्या राजदरबारात महाकवी कालिदासाचे, गुणज्ञ राजा हर्षाच्या शासन कालात जे स्थान लेखक पंडित प्रवर बाणभट्टाचे, स्थान होते तसेच राजा सिद्धराज जयसिंहाच्या राजदरबारात आ० हेमचंद्राचे स्थान होते । अर्थात यावरूनच आ० हेमचंद्र हे सर्वकलागणसंपन्न एक महान आचार्य होऊन गेले हे स्पष्ट होते।
'जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रंथ' या नावाखाली लिहिलेल्या या लेखामध्ये उल्लेखिलेले, आ० उमास्वाति, आ । हरिभद्रसूर, आ० भट्टाकलंक, आ० नेमिचंद्र व आ हेमचंद्र या पाचही आचार्यांचे जैनधर्मात अतिशय महत्त्वपूर्ण व उच्च असे स्थान आहे। या महान आचार्यानी
च्या शाजदरबारन गेले
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org