Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २१५
शक्ती, कर्मपरमाणूची संख्या इ० जडकर्माच्या अवस्थांचे वर्णन केले आहे । थोडक्यात या ग्रंथात जीवा - त्म्याचे मूलस्वरूप, या जीवात्म्याच्या कर्मजन्य विविध संसारी अवस्था, जीवात्म्याचे अंतिम ध्येय, त्या ध्येयमार्गात येणारे भावकर्मरूपी अनेक अडथले, ते कसे टालावेत यांचे मार्गदर्शन अत्यंत व्यवस्थितरीत्या केले आहे । हा ग्रंथ अत्यंत उपयोगी असून नित्य स्वाध्याय करण्यास योग्य आहे । या ग्रंथावर चार टीका लिहिल्या गेल्या आहेत । १. चामुंडरायकृत पंजिकास्वरूप कन्नड भाषेतील टीका । २. अभयचद्र सैद्धांतीकृत टीका ३. केशववर्णीकृत कन्नड टीका ४. ज्ञानभूषण नेमिचंद्राचार्याकृत जीवतत्त्वप्रदीपिका ।
सिद्धातशास्त्राचे निरूपण करणारे आ० नेमिचंद्र सिद्धांतचक्रवर्ती एक महान आचार्य होऊन गेले । त्यांनी 'गोम्मटसार' सारख्या ग्रंथाची रचना करून मुमुर लोकावर महान उपकार केले आहेत । आ० हेमचंद्र व सिद्धहेमशब्दानुशासन
आ० हेमचंद्र ११ व्या शतकातील एक महान विद्वान होऊन गेले । ते श्वेतांबर परंपरेतील एक अनन्यसाधारण विद्वान मानले जातात । त्यांना तत्कालीन 'ज्ञानदीप' असे मानले जाते । भारतीय जैनसाहित्याच्या प्रांगणात सर्वश्रेष्ठ विभूतींच्या मध्ये आ० हेमचंद्र ही एक दिव्य, अलौकिक व महान विभूती होऊन गेली । त्यांची महान बुद्धी, अलौकिक प्रतिभा, गंभीर ज्ञान या गोष्टींच्याविषयी अनुमान करणे, सर्वसाधारण माणसाला अत्यंत कठीण आहे । त्यांनी आपल्या महान मंगलमय ग्रंथरचनेने विद्वानांन मोहवून टाकले आहे । भ० महावीर स्वामींच्या गूढ सिद्धांताचे स्पष्टीकरण सर्वसामान्यासाठी सुलभ करुन देण्याचे महान कार्य त्यांनी केले |
आ० हेमचंद्रांचा जन्म गुजराथमधील धुंधका गावी सन १०८८ मध्ये झाला । त्यांच्या पित्याचे नाव चाचादेव व मातेचे नाव पाहिनीदेवी होते । ते जातीने मोढ महाजन असून त्यांचे जन्मनाव चंगदेव असे होते । बालवयातच त्यांची चाणाक्ष बुद्धि पाहून देवेंद्रसूरिंनी त्यांना जैनधर्माची दीक्षा दिले | देवेंद्रमूरच्या सानिध्यात असतानाच त्यांनी तत्त्वज्ञान, न्याय, काव्य, तर्क, लक्षण व आगम साहित्य याचे सखोल ज्ञान मिलविले ।
सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी नांदू शकत नाहीत असे म्हणतात, परंतु हेमचंद्राच्या बाबतीत हे विपरीत घडल्याचे दिसते । त्यांच्या जिव्हेवर तर सरस्वती जणू नाचत होती; आणि शिवाय तिल लक्ष्मीची साथ म्हणून की काय त्यांना चालुक्यवंशी सिद्धराज जयसिंहाचा राजाश्रय मिलाला होता राजा जयसिंहाला व्याकरणाची फार आवड होती । राजाने हेमचंद्रांना व्याकरण लिहित्याविशयी विनती केली । हेमचंद्रांनी एका महान व्याकरण ग्रंथाची रचना केली । ती पाहून राजाला अत्यानंद झाला । हेमचंद्राच्या उपदेशावरून राजाच्या मनात जैनधर्माविषयी प्रीती उत्पन्न झाली व त्याने त्याच नगरात विशाल जिनमंदिरे उभारली । त्याने आ० हेमचंद्रांना आपले राजगुरु, धर्म-गुरु व दीक्षागुरु मानले । व जैनधर्मतत्त्वांच्या प्रसाराला सुरुवात केले ।
आ० हेमचंद्रांची ग्रंथरचना विशाल आणि समृद्ध आहे । त्यांनी आपल्या प्रतिमेचे वैभव दाखविले नाही असा साहित्याचा एकही विभाग आपणाला दाखविता येणार नाही । न्याय, व्याकरण, काव्य, कोश, छंद, रस, अलंकार नीती, योग, मंत्र, कथा, चरित्र इ० लौककि, अध्यात्मिक दार्शनिक इ० विविध विष
Jain Education International
आर्य श्री आनन्द
आचार्य प्रव26
ग्रन्थ
For Private & Personal Use Only
JO
LUNDLE
ग्रन्थ
www.jainelibrary.org