Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २१३
शरीरांचे तुलनात्मक विवेचन केले आहे । तिस-या अध्यायात अधोलोक, मध्यलोक यांचे विस्तृत विवेचन केले असून च्यौथ्या अध्यायाच्या दरम्यान स्वर्गलोकाचे पूर्ण विवेचन केले आहे पाचव्या अध्यायात षट्द्रव्यांचे विवेचन केले असून, सहाव्या अध्यायात विविध कर्माच आश्रव व त्यांचा परिणाम सांगितला आहे सातव्या अध्यायात जैनगृहस्थीचा आचार कथन केला असून, आठव्या अध्यायात कर्मसिद्धांत मांडला आहे ६ व्या अध्यायात जैनमुनिआचार कथन केला असून १० का अध्यायात मोक्षाचे विवेचना केले आहे ।
अन्य मतांच्या विवेचनासाठी पतंजलीचे महाभाष्य, वैशेषिक सूत्र, न्यायसूत्र, वसुबंधुचा अभिधर्मकोश इत्यादि ग्रंथातील उद्धरणे उधृत केली आहेत ।
खरोखर आ० अकलंकांच्या महान साहित्य कृतींचे अंतरंग डोकावून पाहिलेतर त्यांच्या असामान्य व्यक्तित्वाची छाप आपल्या मनावर सहज पडते ते तर्कप्रधान व विचारप्रधान असे महान विद्वान असून स्वतः अल्पभाषी व सतत विचार जागृती बालगणारे महान आचार्य होऊन गेले ।
आचार्य नेमिचंद्र व गोम्मटसार
आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती हे वि० संवत १९ व्या शतकात होऊन गेले, जैन सिद्धांत साहित्याचे ते एक महान पंडित होते । त्यांना 'सिद्धांत चक्रवर्ती' ही महान पदवी प्राप्त झाली होती । ते नंदिसंघ देशीय गाणचे आचार्य असून राजा श्री राजमल्लदेव, चामुंडराय, श्री राजाभोज यांचे गुरु होते । यावरूनच ते गंगवंशीम राजा मारसिंह व चामुंडराय यांच्चा कालात होऊन गेले असावेत | गंगवंशीयांचा राज्यकाल म्हणजे जैनधर्माच्या दृष्टीने तो एक सुवर्णकाल मानला जातो । कारण जैन धर्माला या गंगवंशीय राजांनी बराच राजाश्रम दिन होता । नेमिचंद्रांच्चा विद्वत्तेला अशा राजांची साथ मिलाली असेल हे सहजशक्य आहे । ते एक चतुर विद्वान व सिद्धांत साहित्यातील प्रकांड पंडित होऊन गले । ते स्वतःहविषयी लिहितात
जइ चक्केण य चक्की छह खंड साहियं अविग्घेण ।
तह मइचक्केण मया छह खंड साहियं सम्मं ॥ ३६७ (गो० क० )
अर्थात 'ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राट आपल्या चक्ररूपी अस्त्राने भरताच्या सहा खंडांना स्ववश करतो, त्याप्रमाणे मी ( नेमिचंद्राने ) आपल्या बुद्धिरूपी चक्राने आद्य सिद्धांत साहित्याचे सहा खंड म्हणजे षट- खंड - आगमाची साधना केली ।'
०नेमिचंद्राच्चा गुरु-शिष्य परंपरेविषयी आपणाला त्यांच्या 'त्रिलोकसार' ग्रंथातून माहिती मिलते । नेमिचंद्रांनी अभयनंदीलाच आपले परमगुरु मानले असून वीरनंदि, इंद्रनंदि यांना ज्येष्ठबंघूवत् नमस्कार केला आहे । कनकनंदीला देखील त्यांनी आपले गुरु मानले आहे । ही गोष्ट त्यांच्चा कालनिर्णयावरून देखील स्पष्ट होते । आ० नेमिचंद्राचा काल साधारणपणे ११ व्या शतकाच्या पूर्वार्धातच मानला आहे । आ० नेमिचंद्रांनी राजा मारसिंह व चामुंडराय या महान भक्तांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच ग्रंथरचना केली आहे । एवढेच नव्हे तर चामुंडराय राजाच्या निमित्तानेच त्यांनी 'गोम्मटसार' या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली आहे ।
Jain Education International
ॐo
For Private & Personal Use Only
CURRICU
30
श्रीआनन्द आम दें- आआनन्द अन
अभि
www.jainelibrary.org