Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 9
________________ संपादकीय जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, आपण स्वतः समजून समोरच्या व्यक्तिला एडजेस्ट नाही झालो, तर भयंकर संघर्ष होत राहतील. जीवन विषमय होईल. आणि शेवटी जग तर जोरजबरदस्तीने सुद्धा आपल्याकडून एडजेस्टमेन्ट करून च घेईल ! आपण जिकडे-तिकडे, खुशीने किंवा नाखुशीने स्वत:हून एडजेस्ट होत च आहोत, तर मग समजून एडजेस्ट व्हायला काय हरकत आहे? असे केल्याने आपण कित्येक संघर्ष टाळू शकू, आणि सुखशांति ही राहिल. __लाईफ इझ नथिंग बट एडजेस्टमेन्ट (जीवनात जुळवून घेण्या सिवाय काहीच पर्याय नाही). जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जुळवून घ्यायलाच लागते । मग रडून घ्या किंवा आनंदाने. शिक्षण आवडो किंवा न आवडो, तरी एडजेस्ट होऊन शिकावे लागतेच! लग्न करतांना कदाचित आपण आनंदाने लग्न करतो परंतु लग्नानंतर संपूर्ण आयुष्य पति-पत्नी ह्या दोघांना एडजेस्टमेन्ट करावेच लागते. दोन भिन्न प्रकृतिच्या माणसानी संपूर्ण आयुष्य एकत्र राहून जुळवून घ्यावेच लागेल. ह्यात आयुष्यभर एकमेकांना पूर्णपणे एडजेस्ट होईल असा भाग्यशाली कोण असणार ह्या काळात?! अरे, प्रत्यक्ष श्रीरामचंद्रजी आणि सीताजी ह्यांना पण कित्येक जागी डिसएडजेस्टमेन्ट नव्हते झाले? सोनेरी हरण आणि अग्निपरीक्षा आणि सीतामाता गर्भवती असतांना देखील जंगलात झालेली हाकलपट्टी! त्यांनी कशाप्रकारे एडजेस्टमेन्ट घेतली असेल? आई-वडील आणि मुले ह्यांना तर पाउलोपाउली एडजेस्टमेन्ट घ्यावे नाही का लागत? जर समजून एडजेस्टमेन्ट घेतले तर शांति राहते आणि कर्म बांधले जात नाही। कुटुंबात, मित्रांच्यामध्ये, व्यापारात, सर्वच ठिकाणी, साहेबाशी, व्यापारी किंवा दलाला बरोबर, कि तेजी-मंदीच्या वेळी सर्वांशी एडजेस्टमेन्ट नाही घेतले तर किती तरी दुःखाचे डोंगर ऊभे राहतील. म्हणन 'एडजेस्ट एवरीव्हेर'ची मास्टर चावी घेऊन जो जगतो, त्यांच्या जीवनात कोणतेही कुलुप उडघणार नाही असे होणार नाही. ज्ञानी पुरुष पूज्य दादाश्री ह्यांनी सोनेरी सूत्र दिले, जीवनात 'एडजेस्ट एवरीव्हेर' केले तर संसार सुखमय होईल! - डॉ. नीरूबेन अमीन

Loading...

Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36